ट्रिपल एचने केलं आश्वासन पूर्ण, मुंबई इंडियन्सला दिला WWE चॅम्पियनशिप बेल्ट
By admin | Published: July 14, 2017 12:57 PM2017-07-14T12:57:06+5:302017-07-14T13:19:09+5:30
मुंबई इंडियन्स संघाने अंतिम सामना जिकंल्यानंतर ट्रिपल एचने रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सला एक भेट देणार असल्याचं आश्वासन दिलं होतं
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14 - इंडियन प्रीमिअर लिगच्या (आयपीएल) दहाव्या मोसमात अंतिम सामना जिंकत ट्रॉफी आपल्या नावे करणा-या मुंबई इंडियन्स संघाला वर्ल्ड रेसलिंग एंटरटेन्मेंट अर्थात WWE सुपरस्टार ट्रिपल एचने अनोखं गिफ्ट दिलं आहे. WWE चा सीओओ आणि सुपरस्टार ट्रिपल एचने आपला चॅम्पियनशिप बेल्ट मुंबई इंडियन्सला भेट म्हणून दिला आहे. मुंबई इंडियन्स संघाने अंतिम सामना जिकंल्यानंतर ट्रिपल एचने रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सला एक भेट देणार असल्याचं आश्वासन दिलं होतं. ते आश्वासन ट्रिपल एचने हा बेल्ट पाठवून पुर्ण केलं आहे.
आणखी वाचा
आयपीएलच्या दहाव्या मोसमातील अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने स्टीव्ह स्मिथच्या रायझिंग पुणे संघाचा पराभव करुन तिसऱ्यांदा अजिंक्यपदावर नाव कोरलं. 22 मे रोजी हा अंतिम सामना पार पडला होता. फक्त एका धावेने मुंबई इंडियन्सने हा सामना जिंकला होता.
यानंतर ट्रिपल एचने आपण मुंबई इंडियन्ससाठी सरप्राईज पाठवत असल्याचं सांगितलं होतं. 13 जुलैला ट्रिपल एचने पुन्हा ट्विट करुन आपण WWE चा किताब अर्थात बेल्ट पाठवत असल्याचं सांगितलं होतं. ट्रिपल एचने आपल्या या ट्विटमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मालाही टॅग केलं होतं
Congratulations, @mipaltan. @WWE has something headed your way! @WWEIndiahttps://t.co/Isjf4gmh1T
— Triple H (@TripleH) May 22, 2017
"मुंबई इंडियन्स...मी शब्द दिल्याप्रमाणे WWE चा खिताब तुमच्यासाठी येत आहे. अभिनंदन" असं ट्विट ट्रिपल एचने केलं असून यामध्ये बेल्टचा फोटोही टाकण्यात आला आहे. या बेल्टवर दोन्ही बाजूला मुंबई इंडियन्सचा लोगोही दिसत आहे.
.@MIPaltan@ImRo45 as promised, the @WWE Title is on its way... Congratulations! @WWEIndiapic.twitter.com/Zkq3bSmPah
— Triple H (@TripleH) July 13, 2017
आयपीएलसारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरुन भारतात WWE चं प्रमोशन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 11 मे रोजी झालेल्या गुजरात लायन्स आणि दिल्ली डेयरडेव्हिल्स यांच्यातील सामन्यागरम्यान बिग ई आणि कोफी किंग्टस्टन यांनी गेस्ट पॅनेल म्हणून हजेरीही लावलेली पाहायला मिळालं होतं.
ट्रिपल एचने एखाद्या स्पर्धेतील विजयी संघाचं कौतुक करत चॅम्पिअनशिप बेल्ट पाठवण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही अशाच प्रकारचा बेल्ट ट्रिपल एचने एनबीए चॅम्पिअन्स गोल्डन स्टेट वॉरिअर्स यांना पाठवला होता.