‘परदेशात यशस्वी ठरण्याचा विश्वास’
By admin | Published: July 17, 2015 03:26 AM2015-07-17T03:26:38+5:302015-07-17T03:26:38+5:30
परदेशातील खेळपट्ट्यांवर नेहमी अपयशी ठरणाऱ्या आॅफ स्पिनर रविचंद्रन आश्विनवर कायमच टीका होत असते. मात्र, यावर आश्विनने आॅस्टे्रलिया दौऱ्यातून
नवी दिल्ली : परदेशातील खेळपट्ट्यांवर नेहमी अपयशी ठरणाऱ्या आॅफ स्पिनर रविचंद्रन आश्विनवर कायमच टीका होत असते. मात्र, यावर आश्विनने आॅस्टे्रलिया दौऱ्यातून आलेल्या अनुभवाच्या जोरावर परदेशी खेळपट्ट्यांवरदेखील बळी घेण्यात यशस्वी होईन, असा विश्वास व्यक्त केला आहे.
आॅस्टे्रलियाविरुद्धच्या चार सामन्यांच्या मालिकेत आश्विनने ४८.६६च्या सरासरीने १२ बळी घेतले होते. आश्विनने या कामगिरीबाबत समाधान व्यक्त करताना सांगितले होते, की आॅस्टे्रलियातील खेळपट्ट्या फिरकीपटूंसाठी अनुकूल नसतात. आॅस्टे्रलिया दौऱ्यातून मी खूप काही शिकलो आहे. याव्यतिरिक्त आश्विन म्हणाला, की २५ बळी घेण्यास आवडेल की चांगली गोलंदाजी करणे आवडेल, असे पर्याय दिल्यास मला चांगली गोलंदाजी करणे आवडेल. कारण चांगल्या गोलंदाजीमुळे बळी मिळतील, हे मी जाणून आहे.
परदेशी खेळपट्ट्यांच्या तुलनेत उपखंडामध्ये आश्विनची कामगिरी चांगली आहे. (वृत्तसंस्था)