त्या विकेट्स ठरल्या सामन्यातील टर्निंग पॉईंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 11:21 PM2017-07-23T23:21:54+5:302017-07-23T23:21:54+5:30
विश्वचषकाच्या अंतिम लढतीत भारतीय महिला संघ सहजपणे जिंकणरा असे वाटत असतानाचा पडलेल्या दोन विकेट्स सामन्यातील टर्निंग पॉइंट ठरल्या.
Next
>ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 23 - ऐतिहासिक लॉर्डसवर झालेल्या अंतिम लढतीत भारतीय महिला संघाला विश्वविजयाने हुलकावणी दिली. हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला गेला. भारतीय महिला संघ सहजपणे जिंकणरा असे वाटत असतानाचा पडलेल्या दोन विकेट्स सामन्यातील टर्निंग पॉइंट ठरल्या. जर त्या विकेट्स पडल्या नसत्या तर कदाचित भारतीय संघाच्या हातात विश्वचषक दिसला असता.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या इंग्लंडला माफक धावसंख्येत रोखल्यावर भारतीय संघासमोर केवळ 229 धावांचे माफक आव्हान होते. पण या आव्हानाचा पाठलाग करणाताना स्मृती मंधाना आणि मिताली राज बाद झाल्या. पण या परिस्थितीत पूनम राऊतने झुंजार खेळी करत भारतीय संघाला सामन्यात कमबॅक करून दिले होते. वेदा कृष्णमूर्तीही तिला चांगली साथ देताना सुरेख फटकेबाजी करत होती. पूनम राऊत ऐतिहासिक लॉर्ड्सवर भारताला अविस्मरणीय विजय मिळवून देणार असे वाटत होते. पण भारतीय संघ 3 बाद 191 अशा सुस्थितीत असताना पूनम राऊत 86 धावांवर बाद झाली. पूनम बाद झाल्यावर भारतीय संघाची मदार वेदा कृष्णमूर्तीवर होती. पण वेदा 34 चेंडूत 35 धावा फटकावून माघारी परतली. या दोघींच्या विकेट्स श्रुबसोलने टिपल्या. या दोन्ही धाकड खेळाडू माघारी परतल्यावर भारताची तळाची फलंदाजी उघडी पडली आणि इंग्लंडच्या खेळाडूंनी डाव साधला.
भारतीय संघाला अंतिम लढतीत इंग्लंडकडून 9 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. भारतावर मात करत इंग्लंडने विजेतेपदाला गवसणी घातली. त्यांचे महिला विश्वचषकातील हे चौथे विजेतेपद ठरले.