महाराष्ट्राच्या तुषारची अंतिम फेरीत धडक

By Admin | Published: July 24, 2016 01:55 AM2016-07-24T01:55:54+5:302016-07-24T01:55:54+5:30

महाराष्ट्राचा अव्वल मानांकित तुषार शहानीने आपल्या लौकिकानुसार खेळ करताना राजस्थानच्या उत्कर्ष बहेतीचा ३-१ असा पराभव करून इंडियन क्लासिक ज्युनियर ओपन स्क्वॉश

Tushar of Maharashtra defeats in final | महाराष्ट्राच्या तुषारची अंतिम फेरीत धडक

महाराष्ट्राच्या तुषारची अंतिम फेरीत धडक

googlenewsNext

मुंबई : महाराष्ट्राचा अव्वल मानांकित तुषार शहानीने आपल्या लौकिकानुसार खेळ करताना राजस्थानच्या उत्कर्ष बहेतीचा ३-१ असा पराभव करून इंडियन क्लासिक ज्युनियर ओपन स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांच्या गटाची अंतिम फेरी गाठली. विशेष म्हणजे, जेतेपदासाठी तुषारसमोर महाराष्ट्राच्याच अरमान जिंदालचे कडवे आव्हान असेल.
भारतीय स्क्वॉश रॅकेट महासंघाच्या मान्यतेने वरळी येथील नॅशनल स्पोटर््स क्लब आॅफ इंडिया (एनएससीआय) येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत तुषारला पहिला गेम जिंकल्यानंतर उत्कर्षकडून कडवा प्रतिकार मिळाला. दुसऱ्या गेममध्ये विजय मिळवून उत्कर्षने सामना बरोबरीत आणल्यानंतर तुषारने आक्रमक खेळ केला. सलग दोन गेम जिंकताना तुषारने ११-९, ८-११, ११-८, ११-८ अशी बाजी मारत दिमाखात अंतिम फेरी गाठली. त्याच वेळी अन्य एका उपांत्य सामन्यात तब्बल पाच गेमपर्यंत रंगलेल्या थरारक लढतीत अरमानने महाराष्ट्राच्याच वीर छोत्रानीचे कडवे आव्हान ११-६, ५-११, १२-१४, १२-१०, ११-६ असे झुंजाररीत्या परतावले.
मुलींच्या १७ वर्षांखालील गटात महाराष्ट्राच्या निकिता जोशीने तामिळनाडूच्या अमिता गोंडीचे आव्हान ११-९, ११-९, ११-९ असे सहजपणे परतावून अंतिम फेरीत प्रवेश केला.
तर या आधी झालेल्या उपांत्य सामन्यात महाराष्ट्राच्या नवमी शर्माला एकतर्फी झालेल्या सामन्यात अव्वल मानांकित तामिळनाडूच्या अशिता भेंग्राविरुद्ध ६-११, ५-११, ५-११ असा पराभव पत्करावा लागला. (क्रीडा प्रतिनिधी)

इतर निकाल
११ वर्षांखालील : (मुले) - युवराज वाधवानी वि.वि. रोहन गोंडी ९-११, ७-११, ११-३, ११-३, ११-२; विवान शाह वि.वि. शौर्य बावा ६-११, ११-७, ११-४, ११-६. (मुली) - काव्या बन्सल वि.वि. स्कंधा डोग्रा ११-५, ११-७, ११-४; अद्विता शर्मा वि.वि. दिया यादव ८-११, ११-५, ११-६, ११-८.
१३ वर्षांखालील : (मुले) - आकाश गुप्ता वि.वि. मोहित भट्ट १४-१२, ११-७, १२-१०; श्रेयश मेहता वि.वि. रौनक सिंग ११-४, ११-७, ११-३. (मुली) - ऐश्वर्या खुबचंदानी वि.वि. तनिष्का जैन ११-७, ११-५, ११-०; दीक्षा औरोबिंदू (तामिळनाडू) वि.वि. साराह वेठेकर ११-८, ११-७, ११-९.
१५ वर्षांखालील : (मुले) - यश फडते वि.वि. नवनीथ प्रभू ११-५, ११-२, ११-२; अद्वैत अदिक वि.वि. नील जोशी ११-५, ११-७, ११-४. (मुली) - टीन यान लौऊ (हाँगकाँग) वि.वि. अनन्या दाबके ११-८, ११-५, ११-८; सिन यूक चॅन (हाँगकाँग) वि.वि. अवनी नगर ११-४, ११-७, ११-९.

Web Title: Tushar of Maharashtra defeats in final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.