छत्तीस कोटी लोक बघतात आयपीएल
By admin | Published: March 10, 2017 06:16 AM2017-03-10T06:16:28+5:302017-03-10T06:16:28+5:30
दहाव्या वर्षात पदार्पण करत असलेल्या इंडियन प्रीमिअर लीगने भारतीय क्रिकेट चाहत्यांना वेड लावलेले असून, हे टी-20 सामने छत्तीस कोटी लोक बघत असल्याची आकडेवारी
मुंबई : दहाव्या वर्षात पदार्पण करत असलेल्या इंडियन प्रीमिअर लीगने भारतीय क्रिकेट चाहत्यांना वेड लावलेले असून, हे टी-टष्ट्वेंटी सामने छत्तीस कोटी लोक बघत असल्याची आकडेवारी पुढे आली आहे. नवव्या सत्रात एकूण ३६.१ कोटी चाहत्यांनी आयपीएलचे सामने पाहिल्याचे सोनी नेटवर्कने जाहीर केले.
दरवर्षी सोनी नेटवर्ककडून करण्यात येणाऱ्या हटके आयपीएल प्रमोशनमुळे या स्पर्धेने लोकप्रियतेचा कळस गाठला असून यंदाची स्पर्धा खास क्रिकेटप्रेमींसाठी अर्पण करण्यात आली आहे. नवव्या सत्रात तब्बल १५.९ कोटी ग्रामीण भागातील लोकांनी आयपीएल पाहिले.महत्त्वाचे म्हणजे एकूण क्रिकेट चाहत्यांमध्ये महिलांची संख्या ४१ टक्के असल्याची माहितीही कंपनीकडून मिळाली आहे.
२०१३ साली स्पॉट फिक्सिंगमुळे डाग लागल्यानंतरही आयपीएलच्या लोकप्रियतेमध्ये कमतरता झाली नाही. याचे श्रेय चाहत्यांना देताना सोनीचे वरिष्ठ बिझनेस प्रमुख नीरज व्यास यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, ‘चाहत्यांमुळेच आयपीएल तुफान यशस्वी झाले असून त्यांंनी खेळावरील प्रेम कधीच कमी होऊ दिले नाही.’
दरवर्षी हटके प्रमोशन
‘दस साल आपके नाम’ असे यंदाच्या आयपीएलचे प्रमोशन करण्यात आले असून २००८ सालापासून क्रिकेटप्रेमींनी ज्याप्रकारे या स्पर्धेला ‘लाईक’ केले आहे, ते सर्वकाही अनेकप्रकारच्या आकर्षक व्हिडिओ प्रमोद्वारे मांडण्याचा उत्कृष्ट प्रयत्न सोनी नेटवर्कने केला आहे. यामध्ये ‘अंतरयामी फॅन’, ‘अंडर प्रेशर फॅन’, ‘वेरी वेरी वेहेमी फॅन’, ‘फरिश्ते फॅन’ आणि ‘आॅल राऊंडर फॅन’ अशा प्रकारचे आकर्षक व्हिडिओ प्रमो तयार करण्यात आले आहेत.