ऑलिम्पिक तयारीसाठी तेजस्विनी, राही, स्वरूपसह पाच खेळांडूना अडीच कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 07:56 PM2020-12-28T19:56:36+5:302020-12-28T19:59:52+5:30
Olympics 2020 sports Kolhapur- टोकियो ऑलिम्पिक २०२१ च्या तयारीसाठी राज्य शासनाने महाराष्ट्रातील खेळाडूंनी चांगली कामगिरी करून पदक प्राप्त करावे. याकरिता प्रोत्साहन म्हणून मिशन ऑलिम्पिकअंतर्गत कोल्हापूरच्या आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी सावंत, राही सरनोबत व पॅराऑलिम्पिक नेमबाज स्वरूप उन्हाळकरसह पाच खेळाडूंना प्रत्येकी पन्नास लाख रुपयांचा धनादेश सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.
कोल्हापूर : टोकियो ऑलिम्पिक २०२१ च्या तयारीसाठी राज्य शासनाने महाराष्ट्रातील खेळाडूंनी चांगली कामगिरी करून पदक प्राप्त करावे. याकरिता प्रोत्साहन म्हणून मिशन ऑलिम्पिकअंतर्गत कोल्हापूरच्या आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी सावंत, राही सरनोबत व पॅराऑलिम्पिक नेमबाज स्वरूप उन्हाळकरसह पाच खेळाडूंना प्रत्येकी पन्नास लाख रुपयांचा धनादेश सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.
वर्षा या मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातील समिती कक्षात झालेल्या या कार्यक्रमात प्रत्येकी पन्नास लाखांच्या निधीचा धनादेश प्रदान करण्यात आला. कोल्हापूरच्या राही, तेजस्विनी व स्वरूप उन्हाळकर यांच्यासह धनुर्विद्या सांघिक खेळाडू प्रवीण जाधव, अविनाश साबळे (मैदानी स्पर्धा) यांचाही पन्नास लाखांचे साहाय्य मिळालेल्यांमध्ये समावेश आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव अशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, शालेय शिक्षण व क्रीडा अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया आदी उपस्थित होते.