टी -20 मालिकेसाठी भारतीय संघात दोन बदल

By admin | Published: January 23, 2017 02:57 PM2017-01-23T14:57:27+5:302017-01-23T15:05:41+5:30

भारत आणि इंग्लंड संघांमधले 26 जानेवारी पासून होणाऱ्या तीन टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

Two changes in the squad for the T20 series | टी -20 मालिकेसाठी भारतीय संघात दोन बदल

टी -20 मालिकेसाठी भारतीय संघात दोन बदल

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 23 -  भारत आणि इंग्लंड संघांमधले 26 जानेवारी पासून होणाऱ्या तीन टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. निवड कऱण्यात आलेल्या संघात आर. अश्विन आणि जडेजाला विश्रांती देण्यात आली आहे. आगामी सहा महिन्यात भारताचे वेळापत्रक व्यस्त आहे. आधीच संघातील मुख्य खेळाडू दुखापतीने त्रस्त आहेत आणि 9 तारखेपासून बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताला कसोटी सामने खेळायचे आहेत. त्यामुळे निवड समितीनं जडेजा आणि अश्विन या दोन प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली आहे. 
 
एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीनं भारतीय संघव्यवस्थापनाशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे. अश्विन आणि जाडेजा यांच्याऐवजी अमित मिश्रा आणि परवेझ रसूल यांचा भारताच्या टी-20 संघात समावेश करण्यात आला आहे.
 
26 जानेवारी, 29 जानेवारी आणि एक फेब्रुवारी रोजी भारत इंग्लंडविरुद्ध तीन टी-20 सामन्याची मालिका खेळणार आहे. 
 

Web Title: Two changes in the squad for the T20 series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.