चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्थानी दोन वर्ल्डकप
By admin | Published: June 21, 2017 01:07 AM2017-06-21T01:07:09+5:302017-06-21T01:07:09+5:30
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद भारताच्या यजमानपदाखाली होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा स्थगित करीत त्याच्या जागी चार वर्षांच्या कालावधीत दोन टी-२० विश्वकप स्पर्धांच्या आयोजनाचा विचार करीत आहे
लंडन : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद भारताच्या यजमानपदाखाली होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा स्थगित करीत त्याच्या जागी चार वर्षांच्या कालावधीत दोन टी-२० विश्वकप स्पर्धांच्या आयोजनाचा विचार करीत आहे. आयसीसीचे मुख्य कार्यकारी डेव्हिड रिचर्डसन यांनी मंगळवारी ही माहिती दिली. रिचर्डसन म्हणाले, पुढील चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा २०२१ मध्ये होईलच, याची हमी देता येणार नाही. याबाबत आयसीसीच्या वार्षिक बैठकीमध्ये या आठवड्यामध्ये चर्चा होईल. आम्ही विश्व स्पर्धेंदरम्यान पुरेसे अंतर ठेवण्यास प्रयत्नशील आहोत. पूर्वघोषित कार्यक्रमानुसार पुढील चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा २०२१ मध्ये भारतात होणार आहे. जर चार वर्षांत दोन टी-२० विश्वकप स्पर्धांचे आयोजन करण्यात आले तर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा रद्द करावी लागेल.