UEFA EURO 2020 - डेन्मार्कचा Cristian Eriksen अचानक मैदानावर कोसळला, सामना रद्द करावा लागला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2021 22:50 IST2021-06-12T22:48:10+5:302021-06-12T22:50:12+5:30
एरिक्सनच्या प्रकृतीसाठी सोशल मीडियातून प्रार्थना करण्यात येत आहे.

UEFA EURO 2020 - डेन्मार्कचा Cristian Eriksen अचानक मैदानावर कोसळला, सामना रद्द करावा लागला
UEFA EURO 2020 - कोपेनहेगन येथे सुरु असलेल्या UEFA EURO 2020 फूलबॉल स्पर्धेतील आजचा सामना मेडिकल इमर्जन्सीमुळे रद्द करण्यात आला आहे. डेन्मार्क आणि फिनलँडमध्ये आजचा सामना खेळविण्यात येत होता. मात्र, सामन्यादरम्यान डेन्मार्कचाफुटबॉलपटू एरिक्सेनला दुखापत झाल्याने तो मैदानावरच कोसळला. त्यानंतर, सामना तात्काळ रद्द करण्यात आला आहे.
एरिक्सनच्या प्रकृतीसाठी सोशल मीडियातून प्रार्थना करण्यात येत आहे.
The UEFA EURO 2020 match in Copenhagen has been suspended due to a medical emergency.
— UEFA (@UEFA) June 12, 2021
सामना सुरु असताना एरिक्सन कोसळला असून त्यास ह्रदयविकाराचा झटका आला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्यासाठी, सोशल मीडियातून प्रार्थना करण्यात येत आहे. जॉय भट्टाचार्य यांनीही ट्विट करुन माहिती दिली आहे.
Eriksen is alive. Fantastic news. This heart attack on a pitch was so scary. https://t.co/ryflG5nuQr
— Joy Bhattacharjya (@joybhattacharj) June 12, 2021