अल्टीमेट खो-खो: कटकमध्ये रंगणार अल्टीमेट खो-खो सीझन दोनचा थरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 19:40 IST2023-12-23T19:40:28+5:302023-12-23T19:40:39+5:30
भुवनेश्वर : अल्टीमेट खो-खो च्या सीझन दोनचा थरार कटक येथील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियमवर रंगणार आहे.

अल्टीमेट खो-खो: कटकमध्ये रंगणार अल्टीमेट खो-खो सीझन दोनचा थरार
भुवनेश्वर : अल्टीमेट खो-खो च्या सीझन दोनचा थरार कटक येथील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियमवर रंगणार असून पहिल्या सामन्यात ओडिशा जगरनॉट्स विरूध्द राजस्थान वॉरियर्स भिडणार आहेत. ओडिशा जुगरनॉट्स, राजस्थान वॉरियर्स, चेन्नई क्विक गन्स, गुजरात जायंट्स, मुंबई खिलाडी व तेलुगू योद्धा हे संघ २४ डिसेंबर २०२३ ते १३ जानेवारी २०२४ या कालावधीत विजेतेपदासाठी एकमेकांसमोर उभे ठाकतील.
मुंबई खिलाडीचा कर्णधार अनिकेत पोटे म्हणाला, “आमच्याकडे युवा आणि अनुभवी खेळाडूंचा उत्तम सांगड घातलेला संघ आहे. हंगामापूर्वी आमचे प्रशिक्षक विकास सूर्यवंशी आणि नितुल दास यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने प्रशिक्षण शिबिरात भाग घेतला होता. सर्व संघामध्ये उत्तम समन्वय असून 16 ते 18 वयोगटातील 33 होतकरू युवकांसह एकूण 145 खेळाडू, देशाच्या विविध कानाकोपऱ्यातून आलेले आहेत. येत्या 21 दिवसांत ही स्पर्धा पार पडणार आहे."
मुंबई खिलाडी संघ: गजानन शेंगाळ, श्रीजेश एस, महेश शिंदे, अनिकेत पोटे, सुभाष संत्रा, हृषिकेश मुर्चावडे, रोकेसन सिंग, पी. शिव रेड्डी, गोविंद यादव, अविक सिंघा, मिलिंद कुरपे, सुनील पात्रा, सुधीर कुमार, एमडी सागर पाशा, सागर पोतदार, रोहन कोरे, कोमल, सचिन पवार, धीरज भावे, देबासिस, शिवा, अजय कश्यप, प्रीतम चौगुले, शिबिन एम, अभिषेक पाथरोडे आणि परमार राहुल.
अल्टीमेट खो-खो Sony Sports Network चॅनेल आणि Sony Liv अॅपवर थेट पहा