पहिल्या कसोटीवर अनिश्चिततेचे ढग

By admin | Published: November 29, 2014 01:13 AM2014-11-29T01:13:26+5:302014-11-29T01:13:26+5:30

भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात पुढील आठवडय़ात सुरू होणा:या पहिल्या कसोटीवर अनिश्चिततेचे ढग आहेत.

Uncertainty cloud on the first test | पहिल्या कसोटीवर अनिश्चिततेचे ढग

पहिल्या कसोटीवर अनिश्चिततेचे ढग

Next
जेम्स सदरलँड : खेळाडू अजूनही शोकाकुल मन:स्थितीत 
सिडनी : फिलिप हय़ुजच्या निधनानंतर खेळाडू आजूनही शोकाकुल स्थितीत आहे आणि अशा परिस्थितीत भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात पुढील आठवडय़ात सुरू होणा:या पहिल्या कसोटीवर अनिश्चिततेचे ढग आहेत. पहिली कसोटी चार डिसेंबरपासून सुरू होत आहे आणि त्यासाठी आठवडय़ाहून कमी कालावधी शिल्लक आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स सदरलँड म्हणाले की, खेळाडू अजूनही शोकाकुल मनस्थितीत आहेत आणि यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना आणखी काही कालावधी हवा. सहा-सात दिवसांत यातून बाहेर पडणो अवघड आहे. त्यामुळे खेळाडू मानसिकदृष्टय़ा तयार झाल्यावरच कसोटीचे आयोजन करण्यात येईल. 
आपल्या सर्वाना क्रिकेटशी प्रेम आहे आणि फिलिपहून अधिक क्रिकेटवर कुणी प्रेम केले नाही. खेळाडू मानसिकरीत्या तयार असतील तेव्हाच सामने खेळविले जातील, असे सदरलँड यांनी स्पष्ट केले. हय़ुजला चेंडू लागला त्या वेळी डेविड वॉर्नर, शेन वॉटसन, ब्रॅड हॅडिन आणि नाथन लिऑन हे मैदानावर उपस्थित होते. 
हय़ुजची अखेरची इच्छा काय होती, हे त्याच्या वडिलांकडून जाणून घेण्याचा प्रय} करत असल्याचे सरदलँड यांनी सांगितले. ते म्हणाले, की गेली काही तास फिलिप यांच्याशी बोलताना जाणवले की ते आणि त्यांचे कुटुंब क्रिकेटवर खूप प्रेम करत 
होते. फिलिप इतरांपेक्षा अधिक क्रिकेटवर प्रेम करायचा आणि 
खेळ सुरू राहिला पाहिजे, हेच 
त्याला हवे होते. पहिल्या कसोटीसंदर्भात आम्ही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी वारंवार चर्चा 
करत आहोत. (वृत्तसंस्था)
 
च्पाकिस्तान आणि न्यूझीलंडच्या खेळाडूंनी व अधिका:यांनी तिस:या कसोटीच्या दुस:या दिवशी तर मिरपूर येथील शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमच्या मैदानावर बांगलादेश विरुद्ध ङिाम्बाब्वे संघाच्या खेळाडूंनी व अधिका:यांनी चौथा एकदिवसीय सामना सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा युवा फलंदाज फिलिप हय़ुज याला o्रद्धांजली वाहिली. त्यांनी एक मिनिटाचे मौन राखले आणि आपापल्या दंडावर काळी पट्टी बांधली. न्यूझीलंड संघाच्या खेळाडूंनी आपल्या 
टी शर्टवर पी.एच. हे शब्द लिहून घेतले होते.
 
वेळापत्रकानुसार पहिली कसोटी होणो गरजेचे 
च्ऑस्ट्रेलियाचे माजी 
कर्णधार इयान चॅपेल आणि मार्क टेलर यांच्या म्हणण्यानुसार भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ब्रिस्बेन येथे पुढील आठवडय़ात होणारी पहिली कसोटी 
नियोजित वेळापत्रकानुसार होणो गरजेचे आहे. 
च्असे केल्यावरच खेळाडू आणि क्रिकेटचाहत्यांना फिलिप हय़ुज याच्या निधनाच्या दु:खातून बाहेर पडणो शक्य होईल, असे या दोन्ही माजी खेळाडूंचे मत आहे.
च्हय़ुजच्या निधनाच्या दु:खातून खेळाडूंना बाहेर पडणो शक्य नाही; परंतु क्रिकेटच या दु:खातून त्यांना बाहेर काढू शकते, असे मत टेलरने व्यक्त केले.
 
काळी पट्टी बांधून भारतीय खेळाडूंचा सराव 
अॅडलेड : ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू फिल ह्युज याच्या दु:खद निधनामुळे दोन दिवसीय सराव सामना रद्द झाल्यानंतर भारतीय खेळाडूंनी या खेळाडूच्या निधनामुळे शोक व्यक्त करताना काळी पट्टी बांधून सराव सत्रत सहभाग घेतला़ ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या सन्मानार्थ भारतीय खेळाडूंनी अॅडलेड ओव्हलमधील मुख्य मैदानावर सराव न करता इनडोअर स्टेडियममध्ये सराव केला़ दरम्यान, दक्षिण ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने ह्युजची कॅप, जर्सी आणि बॅट मुख्य विकेटवर ठेवून या युवा खेळाडूला श्रद्धांजली वाहिली़ त्यानंतर संघाचे सीईओ कीथ ब्रेडशा यांनी पत्रकार परिषदेत या कठीण प्रसंगी ह्युज आणि त्याच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करणा:यांचे विशेष आभार मानल़े 
 
एबोटलाही मिळतेय समर्थन
ऑस्ट्रेलियाचा युवा गोलंदाज सीन एबोट यालाही 
कठीण काळात चहुबाजूंनी समर्थन मिळत आहे. एबोटच्या बाउन्सरवर फिलिप हय़ुजला दुखापत झाली होती व त्यात त्याचा मृत्यू झाला. या सदम्याने एबोट खूप दुखावला गेला. अशा प्रसंगी जगभरातील क्रिकेटपटूंसह हय़ुजची बहीण मेगानही एबोटच्या पाठीशी उभी राहिली आहे.
 
ऑस्ट्रेलिया मीडियाचीही o्रद्धांजली
ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय दैनिकांनी पहिल्या पानावर फिलिप हय़ुजला o्रद्धांजली वाहिली आहे. सिडनी मॉर्निग हेराल्डने हय़ुजवर 12 पाने काढली. ‘एक डाव जो लवकर समाप्त झाला, अशा दु:खात राष्ट्र सहभागी आहे. 
 
ट्विटरवर ‘पुट आऊट युअर बॅट्स’ अभियान
सिडनी : फिलिप हय़ुज याला o्रद्धांजली वाहण्यासाठी जगभरातील क्रिकेट खेळाडू आणि चाहत्यांनी ट्विटरवर ‘पुट आऊट युअर बॅट्स’ अभियान राबवले. या अभियानात प्रत्येक जण बॅट बाहेर काढून त्याचा फोटो ट्विटरवर टाकत आहे. अशा छायाचित्रंचा भडिमार ट्विटरवर होत आहे.  भारताचा फलंदाज अजिंक्य रहाणो यानेही भारतीय संघाची टोपी आपल्या बॅटवर ठेवून त्यावर ‘आरआयपी फिल हय़ुज’ असा संदेश असलेले छायाचित्र टाकले आहे. सुरेश रैनानेही असे छायाचित्र टाकले आहे. 

 

Web Title: Uncertainty cloud on the first test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.