अंडर १९ विश्वकपचा संघ संतुलित : द्रविड

By admin | Published: December 23, 2015 11:44 PM2015-12-23T23:44:49+5:302015-12-23T23:44:49+5:30

भारताच्या १९ वर्षाखालील संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि माजी भारतीय कर्णधार राहूल द्रविड यांनी भारताचा १९ वर्षाखालील संघ समतोल असल्याचे स्पष्ट केले आहे

Under-19 World Cup: Balanced: Dravid | अंडर १९ विश्वकपचा संघ संतुलित : द्रविड

अंडर १९ विश्वकपचा संघ संतुलित : द्रविड

Next

नवी दिल्ली : भारताच्या १९ वर्षाखालील संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि माजी भारतीय कर्णधार राहूल द्रविड यांनी भारताचा १९ वर्षाखालील संघ समतोल असल्याचे स्पष्ट केले आहे. हा संघ बांगलादेशच्या यजमानपदाखाली २७ जानेवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणार आहे.
१९ वर्षाखालील संघाची निवड मंगळवारी करण्यात आली.हा संघ संतुलित असून सर्व खेळाडू उत्कृष्ठ आहेत.
द्रविड म्हणाला की, ‘‘ या संघाने तिरंगी मालिकेत विजय मिळवल्याने आपण आनंदी आहोत. या सर्वांनी उत्तम प्रदर्शन केले. या स्पर्धेत जवळपास २० खेळाडूंना खेळण्याची संधी मिळाली. या खेळाडूंनी आपली क्षमता सिद्ध केली. संघाला तयारी करण्यासाठी जास्त वेळ मिळाला नाही, हे कारण देता येत नाही. मात्र त्यामुळए जास्त युवकांना संघी मात्र देता आली नाही. मला जास्तीत जास्त खेळाडूंना संधी देणे आवडते. त्यामुळे खेळांडूंमध्ये रोटेशन करण्यास जास्त वाव मिळतो. श्रीलंका आणि भारतात झालेल्या मालिकेत खेळाडूंमध्ये रोटेशन करता आले. त्यामुळे त्याचा उत्तम पर्याय निर्माण करता आला.
भारत या स्पर्धेत ग्रुप डीमध्ये आॅस्ट्रेलिया, न्यूझिलंड आणि नेपाल सोबत आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Under-19 World Cup: Balanced: Dravid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.