विना चालकाचे डंपर धडकले दुचाकीवर डी.मार्टजवळ झाला अपघात : सुदैवाने मोठी घटना टळली

By admin | Published: July 1, 2016 10:02 PM2016-07-01T22:02:16+5:302016-07-01T22:02:16+5:30

जळगाव : विना चालकाचे डंपर उतारवरुन पुढे जावून दुचाकीवर धडकले. त्यात दुचाकीचे नुकसान झाले, पुढे हे डंपर वॉलकंपाऊडच्या खांबावर आदळल्यामुळे थांबले. सुदैवाने रस्त्यावर कोणी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. हा अपघात शुक्रवारी दुपारी अडीच वाजता डी.मार्टजवळ झाला.अपघातानंतर पोलिसांनी डंपर ताब्यात घेतले आहे.

Unidentified motorcycle collapses on D-motor | विना चालकाचे डंपर धडकले दुचाकीवर डी.मार्टजवळ झाला अपघात : सुदैवाने मोठी घटना टळली

विना चालकाचे डंपर धडकले दुचाकीवर डी.मार्टजवळ झाला अपघात : सुदैवाने मोठी घटना टळली

Next
गाव : विना चालकाचे डंपर उतारवरुन पुढे जावून दुचाकीवर धडकले. त्यात दुचाकीचे नुकसान झाले, पुढे हे डंपर वॉलकंपाऊडच्या खांबावर आदळल्यामुळे थांबले. सुदैवाने रस्त्यावर कोणी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. हा अपघात शुक्रवारी दुपारी अडीच वाजता डी.मार्टजवळ झाला.अपघातानंतर पोलिसांनी डंपर ताब्यात घेतले आहे.
डी.मार्ट जवळ पेट्रोल पंपासमोर चार डंपर उभे करण्यात आले होते. त्यापैकी एम.एच.१९ झेड ४४६२ या क्रमांकाचे डंपर सुरू ठेवून चालक पेट्रोल पंपावर पाणी पिण्यासाठी निघून गेला. त्यानंतर काही क्षणातच हा डंपर हळूहळू उतारावरून पुढे सरकाला, त्यात गती आल्याने त्याच्या पुढे थांबलेल्या डंपरला (क्र.एम.एच.१९ झेड.६३६३) ला एका बाजूने धडक देवून हा डंपर पुढे गेला. यावेळी त्या डंपरचा चालकाच्या बाजूच्या दरवाजाचे नुकसान झाले. त्यांनतर पुढे दुचाकीवर (क्र.एम.एच.१९ बी.के.२७५७) धडकले.शेजारी असलेल्या आणखी एका दुचाकीचेही (क्र.एम.एच.१९ सी.के.८५४०) नुकसान झाले.
शिक्षिकेची आहे दुचाकी
अपघातात नुकसान झालेली एक दुचाकी शिक्षिकेची आहे, तर दुसरी तेथेच राहणारे लाला बाबुसिंग परदेशी यांची आहे. ग्रामीण ड्युटी असल्याने या शिक्षिका परदेशी यांच्या वॉलकंपाऊडमध्ये दुचाकी लावून बसने पुढे जातात. घटनास्थळवर दुचाकीच्या मालक असलेल्या शिक्षिका नसल्याने त्यांचे नाव समजू शकले नाही.
...तर मोठी घटना घडली असती
अपघात झाला त्या ठिकाणी किराणा दुकान व वस्ती आहे. नेहमी त्या जागेवर लहान मुले खेळतात व परिसरातील नागरिक येऊन बसतात. सुदैवाने अपघात झाला तेव्हा तेथे कोणीच नव्हते, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. त्यात केवळ दोन दुचाकी,एका डंपरचा दरवाजा व वॉलकंपाऊडचा सिमेंटच्या पोलचे नुकसना झाले. घटनास्थळावर एमआयडीसी पोलीस स्टेशनचे कर्मचारी तातडीने पोहचले. डंपर त्यांनी पोलीस स्टेशनला जमा केला आहे.

Web Title: Unidentified motorcycle collapses on D-motor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.