भारताला मोठा झटका! युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे सदस्यत्व निलंबित केले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 12:05 PM2023-08-24T12:05:54+5:302023-08-24T12:06:21+5:30

कुस्तीप्रेमींसाठी एक मोठी बातमी आहे. युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व निलंबित केले आहे.

United World Wrestling suspended its membership of the Wrestling Federation of India | भारताला मोठा झटका! युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे सदस्यत्व निलंबित केले

भारताला मोठा झटका! युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे सदस्यत्व निलंबित केले

googlenewsNext

भारतातील कुस्तीप्रेमींसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व निलंबित केले आहे. भारतीय कुस्तीपटूंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने ३० मे रोजी भारतीय कुस्ती महासंघाला पत्र लिहून सांगितले होते की, येत्या ४५ दिवसांत भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक न झाल्यास, युनायटेड वर्ल्ड रेसलिंग या भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्वाला स्थिगिती देईल.

चंद्रानंतर आता मिशन 'आदित्य', ISRO थेट सूर्यावर पोहोचणार! सुरू झालीय तयारी

भारतीय महिला कुस्तीपटूंच्या ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर झालेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर क्रीडा मंत्रालयाने रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांना निलंबित करून ADHOC समितीची स्थापना केली होती. 

जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एमएम कुमार यांची कुस्ती महासंघाच्या नव्या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. तत्पूर्वी, युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (UWW), कुस्तीची जागतिक प्रशासकीय संस्था, भारतासाठी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी अंतिम प्रवेशिका सादर करण्यासाठी १६ ऑगस्टची अंतिम मुदत वाढवण्याच्या तदर्थ समितीच्या विनंतीस "तत्त्वतः" सहमती दिली होती.

१२ ऑगस्ट ही निवडणुकीची तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र ११ ऑगस्ट रोजी होणाऱ्या निवडणुकीपूर्वी दीपेंद्र हुड्डा यांनी हरियाणात कुस्तीला पाठिंबा दिला. असोसिएशनने हरियाणा उच्च न्यायालयाच्या निवडणुकीला स्थगिती दिली.

Web Title: United World Wrestling suspended its membership of the Wrestling Federation of India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.