जलतरणमध्ये निर्विवाद वर्चस्व

By admin | Published: February 5, 2015 01:21 AM2015-02-05T01:21:19+5:302015-02-05T01:21:19+5:30

बुधवारी तिसऱ्या दिवस अखेर महाराष्ट्राने १३ सुवर्ण, ११ रौप्य व १४ कास्यपदके आपल्या नावावर केली.

Unquestionable domination in swimming | जलतरणमध्ये निर्विवाद वर्चस्व

जलतरणमध्ये निर्विवाद वर्चस्व

Next

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : डायव्हिंगमध्ये रितीकाचा विक्रम; पुरुष व महिला रिलेमध्ये सुवर्ण
तिरुअनंतपूरम : महाराष्ट्राच्या रितीका श्रीरामने डायव्हिंगमध्ये आणि वीरधयल खाडे, सौरभ सांगवेकर, रोहित हवालदार, इशान जफर तर महिला गटात आरती घोरपडे, आकांशा व्होरा, अदिती घुमटकर, मोनिका गांधी यांनी ४ बाय २०० मीटर रिले प्रकारात सुवर्णपदक जिंकून ३५ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आपला दबदबा कायम राखला. बुधवारी तिसऱ्या दिवस अखेर महाराष्ट्राने १३ सुवर्ण, ११ रौप्य व १४ कास्यपदके आपल्या नावावर केली.
महिलांच्या तीन मीटर स्प्रिंगबोर्ड डायव्हिंग प्रकारात महाराष्ट्राच्या रितीका श्रीरामने २१४.३५ गुण संपादन करून नवीन विक्रमासह सुवर्णपदक जिंकले. सिमरण रमणीला २०१ गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पुरुष गटात तुषार टाकेने रौप्यपदक जिंकले.
जलतरण : पुरुष गटात ४ बाय २०० मीटर रिलेमध्ये महाराष्ट्राचा विरधवल खाडे, रोहित हवालदार, सौरभ सांगवेकर, इशान जफर यांनी ७:४४.२४ वेळेची नोंदकरुन सुवर्णपदकावर आपला हक्क प्रस्तापित केला. महिला गटात महाराष्ट्राच्या आरती घोरपडे, आकांशा व्होरा, अदिती घुमटकर, मोनिका गांधी यांनी उत्कृष्ट कामगिरी करुन ४
बाय २०० मीटर रिलेमध्ये ८:५४.७३ वेळेची नोंद करुन सुवर्णपदक जिंकताना नवीन विक्रमाची नोंद केली. ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात महाराष्ट्राच्या मोनिका गांधीने ३५.८० वेळ नोंदवून रौप्य तर पूर्वा शेटेने ३५.९३ वेळेची नोंद करुन कास्यपदक जिंकले.
जिम्नॅस्टिक : महिलांच्या रिदमिकमध्ये महाराष्ट्राच्या मधुरा तांबे, दिशा निद्रे, मानसी सुर्वे, निशता शाह यांनी उत्कृष्ट कला सादर करुन केस्यपदक जिंकले.
लॉन टेनिस : महाराष्ट्राच्या रश्मी तेलतुंबडे, प्रार्थना ठोंबरे, सोनल फडके, मिहिका यादव व वासंती शिंदे यांना कास्यपदकावर समाधान मानावे लागले. गुजरातविरुध्दच्या उपांत्य सामन्यात पहिल्या एकेरीत रश्मी तेलतुंबडेला इती मेहताकडून ४-६, ६-७ असा पराभव पत्करावा लागला. दुसऱ्या एकेरीत प्रार्थना ठोंबरेला अंकिता रैनाने ६-०, ६-१ असे पराभूत केला. पुरुष गटात सुध्दा महाराष्ट्र संघाला कास्यपदक मिळाले. तेलंगानाविरुध्दच्या पहिल्या एकेरीत शाहबाज खानला विष्णू वर्धनने ३-६, ६-७(४) तर दुसऱ्या एकेरीत आकाश वाघला साकेत मायनेनीने ६-७ ९८), ३-६ असो नमविले. (वृत्तसंस्था)

महिला स्पोर्ट्स रायफल प्रोनमधे महाराष्ट्राला सुवर्ण
महाराष्ट्राची तेजस्विनी सावंत, दीपाली देशपांडे आणि प्रियल केणी यांनी अचूक लक्ष्य साधून महिलांच्या स्पोटर््स रायफल प्रोन प्रकारात १८३२.८ गुण संपादन करून सुवर्णपदक आपल्याकडेच राखण्यात यश मिळविले. गत राष्ट्रीय स्पर्धेतसुद्धा महाराष्ट्राच्या महिलांनी सुवर्णपदक जिंकले होते. या प्रकारात तेजस्विनीने ६१५.८,
दीपालीने ६०८ व प्रियलने ६०८.३ गुण संपादन केले. या प्रकारात हरियाणाच्या महिलांनी १८३० आणि पश्चिम बंगालच्या महिलांनी १८०९ गुणांसह अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक जिंकले.

कुस्तीत महाराष्ट्राला पुढीलप्रामाणे एकूण ८ पदके
नाव वजनगटपदक
विक्रम कुऱ्हाडे ५९किलो कांस्यपदक
वसंत सरवदे ६६ किलो रौप्यपदक
अण्णासाहेब जगताप ७५किलो रौप्यपदक
योगेश पवार १३०किलो कांस्यपदक
कौशल्या वाघ ५३किलो कांस्यपदक

महिला गटात होईल‘कॉंटे की टक्कर ’
च्खो-खो : ‘राकट देशा , कणखर देशा़.’ या गोविंदाग्रजांच्या काव्यपंक्तीची हुबेहूब प्रचिती देणारा ‘राकट’ खेळ करून महाराष्ट्राच्या दोन्ही खो-खो संघानी खो-खो स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रतिस्पर्धी संघाचे बुरूज नेस्तनाबूत करीत दणक्यात अंतिम फेरी गाठली़ थिरूअनंतपूरम येथील श्रीपादम स्टेडियम येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात महिला गटात महाराष्ट्राने पश्चिम बंगालचे आव्हान ९-५ असे १ डाव व ४ गुणांनी परतवून लावत दिमाखात अंतिम फेरी गाठली़
च्महाराष्ट्राने प्रतिस्पर्धी संघाचे ९ गडी बाद केले व त्यात अनुभवी खेळाडू शिल्पा जाधवने ३ गडी टिपले तिला सुप्रिया गाढवे व सोनाली मोकासेने प्रत्येकी २ गडी बाद करून सुरेख साथ दिली़ संरक्षण करताना पहिल्या तुकडीतील प्रियांका येळेने २.५० मि. वेळ नोंदवून छान सुरूवात करून दिली व नंतर सारिका काळे ( २.५०मि) व श्रुती सकपाळ ( २.२०मि) यांनी बंगालचे आक्रमण थोपवून धरले. फॉलोआॅन नंतर संरक्षण करताना सुप्रिया गाढवेने (३.१०मि), पोर्णिमा सकपाळ (२.५० मि), ऐश्वर्या सावंत (३ मि. नाबाद) संरक्षण करून सामना खिशात घातला़
च्पुरूष संघाने पारंपारिक प्रतिस्पर्धी कर्नाटकचा ११-८ असा १ डाव व ३ गुणांनी पराभव केला़ युवराज जाधव (१.४०मि नाबाद, १.५०मि व ३ गडी), नरेश सावंत ( २.१०मि व १ गडी), दिपेष मोरे ( ३.३०मि) तसेच बाळासाहेब पोकार्डे ( २.१०मि व १ गडी) हे विजयाचे प्रमुख शिलेदार होते़

पूजाला दुहेरी मुकुट; मिश्र दुहेरीत सुवर्णपदक
महाराष्ट्राच्या अमन बालगु व पूजा सहस्त्रबुध्देने मिश्र दुहेरीत तामिलनाडूच्या ए. अमलराज व के. शामिनीचा ३-० गेममध्ये पराभव करुन सुवर्णपदकावर आपला हक्क प्रस्तापति केला. पूजा सहस्त्रबुध्देने यापूर्वी सांघिक गटात सुवर्ण व महिला दुहेरीत कास्यपदक जिंकून या स्पर्धेत तीन पदकांची कमाई केली. अमन व पूजा जोडीने ए. अमलराज व के. शामिनीचा सरळ तीन गेममध्ये ११-८, ११-७,११-५ असा पराभव केला.

 

Web Title: Unquestionable domination in swimming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.