उरी हल्ल्यातील शहिदांना विजेतेपद समर्पित : श्रीजेश

By admin | Published: November 2, 2016 07:08 AM2016-11-02T07:08:01+5:302016-11-02T07:08:01+5:30

कर्णधार पी. आर. श्रीजेश याने हे विजेतेपद उरी सैनिकतळावर झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांना समर्पित केले

Uri's martyrdom dedicated to championship: Sreejesh | उरी हल्ल्यातील शहिदांना विजेतेपद समर्पित : श्रीजेश

उरी हल्ल्यातील शहिदांना विजेतेपद समर्पित : श्रीजेश

Next


नवी दिल्ली : पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला हरवून आशियाई चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाचा कर्णधार पी. आर. श्रीजेश याने हे विजेतेपद उरी सैनिकतळावर झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांना समर्पित केले आहे.
भारतीय हॉकी संघाने जबरदस्त कामगिरी करीत पाकिस्तानला ३-२ असे हरवून एशियन चॅम्पियन्स हॉकी स्पर्धा जिंकून भारतीयांना दिवाळी भेट दिली होती. काल या संघाचे मायदेशी आगमन झाले.
या वेळी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पत्रकारांशी बोलताना भारतीय कर्णधार श्रीजेश म्हणाला की, हा चषक भारतीय सैनिकांना दिवाळीची भेट आहे. आपला जीव धोक्यात घालून सीमेवर तैनात राहणारे जवान या सन्मानाचे हक्कदार आहेत. श्रीजेश म्हणाला की, उरीमध्ये अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड
हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या भारतीय वीर जवानांना हे विजेतेपद समर्पित आहे. (वृत्तसंस्था)
>श्रीजेशला दंड
विमान प्रवासादरम्यान अधिक सामान जवळ बाळगल्याने १५०० रुपये इतका दंड बसल्यानंतर एअर एशिया कंपनीवर भारतीय हॉकी संघाचा स्टार गोलरक्षक पी. आर. श्रीजेश याने आपली नाराजी स्पष्ट केली. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तानला नमवून चॅम्पियन बनलेल्या टीम इंडियासह श्रीजेश स्वदेशी परतत होता. यावेळी त्यासह खेळाचे सामान होते.

Web Title: Uri's martyrdom dedicated to championship: Sreejesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.