यू.एस ओपनमध्ये भारतीयांचा डंका, सानिया, पेस दुहेरीच्या फायनलमध्ये

By admin | Published: September 10, 2015 08:41 AM2015-09-10T08:41:15+5:302015-09-10T15:18:36+5:30

सानिया मिर्झा व मार्टिना हिंगिसने महिला दुहेरीत आणि लिअँडर पेस व मार्टिना हिंगिसने मिश्र दुहेरीत अंतिम फेरी गाठल्याने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत भारतीयांचा डंका वाजत आहे.

In the US Open, India's Danka, Sania and Paes are in the doubles final | यू.एस ओपनमध्ये भारतीयांचा डंका, सानिया, पेस दुहेरीच्या फायनलमध्ये

यू.एस ओपनमध्ये भारतीयांचा डंका, सानिया, पेस दुहेरीच्या फायनलमध्ये

Next
>ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. १० -  सानिया मिर्झा व मार्टिना हिंगिसने महिला दुहेरीत आणि लिअँडर पेस व मार्टिना हिंगिसने मिश्र दुहेरीत अंतिम फेरी गाठल्याने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत भारतीयांचा डंका वाजत आहे. 
बुधवारी रात्री झालेल्या महिल्या दुहेरीच्या उपांत्य लढतीत सानिया व मार्टिनाने अकराव्या मानांकित इटलीच्या सारा एर्रानी-फ्लाव्हिया पेन्नेट्टा यांचा ६-४,६-१ असा सरळ दोन सेट्समधअये पराभव केला. तर त्यानंतर मार्टिनानेच लिअँडर पेसबरोबर मिश्र दुहेरीचा सामना खेळत रोहन बोपण्णा - युंग जॅन चॅन जोडीवरही मात केली. त्यांनी हा सामना ६-२, ७-५ असा जिंकला.
सानिया व मार्टिनाने अंतिम फेरीत प्रवेश करत या वर्षीचे दुसरे ग्रँड स्लॅम जिंकण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. त्यांनी यापूर्वी विम्बल्डने विजेतेपद पटकावले होते.  

Web Title: In the US Open, India's Danka, Sania and Paes are in the doubles final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.