उसेन बोल्ट एक आठवड्याआधीच रिओत पोहोचला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2016 03:12 AM2016-07-29T03:12:59+5:302016-07-29T03:12:59+5:30
जगातील सर्वांत वेगवान धावपटू जमैकाचा युसेन बोल्ट ५ आॅगस्टपासून सुरू होणाऱ्या आॅलिम्पिक स्पर्धेला एक आठवडा बाकी असतानाच ब्राझीलचे यजमान शहर रिओ डी
किंग्जस्टन : जगातील सर्वांत वेगवान धावपटू जमैकाचा युसेन बोल्ट ५ आॅगस्टपासून सुरू होणाऱ्या आॅलिम्पिक स्पर्धेला एक आठवडा बाकी असतानाच ब्राझीलचे यजमान शहर रिओ डी जेनेरो येथे पोहोचला आहे. तेथे तो या वेळेस ‘स्प्रिंट स्वीप’साठी उतरणार आहे.
विश्व विक्रमवीर बोल्ट याआधी जमैका निवड चाचणीदरम्यान दुखापतीमुळे सहभागी होऊ शकला नव्हता आणि त्याने गत शुक्रवारी त्याची तंदुरुस्ती चाचणी दिली होती. तो लंडन डायमंड लीगमध्ये २00 मीटर शर्यतीत १९.८९ सेकंद वेळ नोंदवीत चॅम्पियन बनला होता.
२९ वर्षीय बोल्ट जमैकाच्या प्री-आॅलिम्पिक कॅम्पमध्ये सहभागी होणार असून, त्याचा इरादा रिओ आॅलिम्पिकमध्ये १00 मीटर, २00 मीटर आणि ४ बाय १00 मीटर रिले शर्यतीत सुवर्णपदक जिंकण्याचा असेल. अशी कामगिरी करण्यात बोल्ट यशस्वी ठरल्यास तो जगातील पहिला अॅथलिट ठरेल, ज्याने सलग तीन आॅलिम्पिकमध्ये १00, २00 आणि ४ बाय १00 मी. रिलेत सुवर्णपदक जिंकले आहे.
बोल्टने दुखापतीमुळे जमैका ट्रायलमधून माघार घेतली होती. (वृत्तसंस्था)