आॅस्ट्रेलियन चॅम्पियनशिपमध्ये उसेन बोल्टची एंट्री

By admin | Published: November 5, 2016 05:36 AM2016-11-05T05:36:25+5:302016-11-05T05:36:25+5:30

वायुवेगाने धावणारा जमैकाचा धावपटू उसेन बोल्ट हा पुढील वर्षी आॅस्ट्रेलियात आयोजित सांघिक चॅम्पियनशिपमध्ये पहिल्यांदा सहभागी होणार आहे.

Usain Bolt's entry in the Australian championship | आॅस्ट्रेलियन चॅम्पियनशिपमध्ये उसेन बोल्टची एंट्री

आॅस्ट्रेलियन चॅम्पियनशिपमध्ये उसेन बोल्टची एंट्री

Next


मेलबोर्न : वायुवेगाने धावणारा जमैकाचा धावपटू उसेन बोल्ट हा पुढील वर्षी आॅस्ट्रेलियात आयोजित सांघिक चॅम्पियनशिपमध्ये पहिल्यांदा सहभागी होणार आहे. ३० वर्षांच्या बोल्टने शुक्रवारी ही माहिती दिली. त्याने रिओ आॅलिम्पिक आटोपताच निवृत्ती जाहीर केली होती.
नऊ वेळेचा आॅलिम्पिक चॅम्पियन बोल्ट मेलबोर्न येथे फेब्रुवारीत निट्रो अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ‘बोल्ट आॅफ आॅल स्टार्स’चे नेतृत्व करेल. जमैकाचा हा स्टार खेळाडू म्हणाला, ‘ट्रॅक अँड फिल्ड’च्या या अनोख्या स्पर्धेशी जुळून आनंद झाला. मी केवळ स्पर्धक नाही, तर येथे कर्णधारदेखील असेन.’
रिओ आॅलिम्पिकच्या १००, २०० तसेच चार बाय १०० मीटरचे सुवर्ण जिंकून सुवर्ण हॅट्ट्रिक साजरी करणाऱ्या बोल्टने आॅस्ट्रेलियन चॅम्पियनशिपशी जुळण्यासाठी ७ लाख ६० हजार पौंड डॉलरचा करार केला. या स्पर्धेचे पहिले सत्र लेकसाईड स्टेडियममध्ये ४, ९ आणि ११ फेब्रुवारीला आयोजित करणार आहे. यात सहा संघ सहभागी होतील. सर्व संघांत २४ पुरुष आणि महिला धावपटू आहेत.
या स्पर्धेत बिगर पारंपरिक पद्धतीने मध्यम पल्ल्याची दौड तसेच अडथळा दौडही होईल.
बोल्ट म्हणाला, ‘निट्रो अ‍ॅथलेटिक्ससारख्या स्पर्धेची ट्रॅक अँड फिल्ड प्रकाराला गरज आहे.’ हे खेळाचे नवे स्वरूप आहे. बोल्टने रिओ आॅलिम्पिकनंतर आॅलिम्पिकमधून निवृत्ती जाहीर केली होती. तथापि, २०१८ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेपर्यंत करिअर सुरू ठेवणाऱ्या वृत्ताचा इन्कारदेखील केलेला नाही.(वृत्तसंस्था)

Web Title: Usain Bolt's entry in the Australian championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.