जागतिक स्पर्धेतील उसेन बोल्टची मक्तेदारी संपुष्टात; 10 महिन्यापूर्वी आई बनलेल्या धावपटूची कमाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 04:15 PM2019-09-30T16:15:57+5:302019-09-30T16:16:56+5:30

अमेरिकेच्या एलिसन फेलिक्सने सोमवारी जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतील उसेन बोल्टची मक्तेदारी संपुष्टात आणली.

USA's Allyson Felix surpasses Usain Bolt's world record tally of gold medals at World Championships | जागतिक स्पर्धेतील उसेन बोल्टची मक्तेदारी संपुष्टात; 10 महिन्यापूर्वी आई बनलेल्या धावपटूची कमाल

जागतिक स्पर्धेतील उसेन बोल्टची मक्तेदारी संपुष्टात; 10 महिन्यापूर्वी आई बनलेल्या धावपटूची कमाल

Next

अमेरिकेच्या एलिसन फेलिक्सने सोमवारी जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतील उसेन बोल्टची मक्तेदारी संपुष्टात आणली. फेलिक्सने दोहा येथे सुरू असलेल्या स्पर्धेत 4 बाय 400 मीटर मिश्र रिले प्रकारात आपल्या संघाला सुवर्णपदक जिंकून देताना उसेन बोल्टचा विक्रम मोडला. विशेष म्हणजे 10 महिन्यांपूर्वी फेलिक्सला पुत्रप्राप्ती झाली होती. या सुवर्णपदकासह जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक 12 सुवर्णपदकं जिंकण्याची कमाल केली आहे. यापूर्वी हा विक्रम उसेन बोल्टच्या नावावर होता. 2017मध्ये बोल्ट अखेरचा या स्पर्धेत उतरला होता. त्याच्या नावावर 11 सुवर्णपदकं आहेत. 


अमेरिकेच्या मिश्र रिले संघाने तीन मिनिट 9.34 सेकंदासह विश्वविक्रमाची नोंद करताना सुवर्णपदक जिंकले. 


33 वर्षीय फेलिक्सने जागतिक स्पर्धेत पाचव्यांदा सहभाग घेतला आहे. तिनं 200 मी., 400 मी., 4 बाय 100 मी., 4 बाय 400 मी आणि 4 बाय 400 मी. मिश्र रिले अशा विविध स्पर्धांमध्ये 12 सुवर्णपदक जिंकले आहेत. सहा वेळा ऑलिम्पिक विजेत्या फेलिक्सने गतवर्षी नोव्हेंबरमध्ये मुलीला जन्म दिला. त्यानंतर ती प्रथमच मैदानावर उतरली. 

 

Web Title: USA's Allyson Felix surpasses Usain Bolt's world record tally of gold medals at World Championships

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.