दक्षिण आफ्रिकेत होणार नवीन ‘डीआरएस’चा वापर
By admin | Published: September 24, 2016 05:19 AM2016-09-24T05:19:44+5:302016-09-24T05:19:44+5:30
दक्षिण आफ्रिका व आयर्लंड दरम्यान होणाऱ्या एकमेव आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात नवीन डीआरएस प्रणालीचा प्रथमच वापर करण्यात येणार आहे.
जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिका व आयर्लंड दरम्यान होणाऱ्या एकमेव आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात नवीन डीआरएस प्रणालीचा प्रथमच वापर करण्यात येणार आहे.
नवीन सुधारित डीआरएस प्रणालीमध्ये पायचितसंदर्र्भात अधिक निर्णय दिले जाण्याची शक्यता आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)च्या डीआरएस प्रणालीला विरोध केल्यामुळे भारत-न्यूझीलंड दरम्यान सुरू असलेल्या मालिकेत ही प्रणाली वापरली जाणार नाही. रविवारी दक्षिण आफ्रिका व आयर्लंड दरम्यान बेनोनी येथे एकदिवसीय सामना होणार आहे. या सामन्यात नवीन डीआरएस प्रणालीचा उपयोग करण्यात येणार आहे. या सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आचारसंहितेत केलेले बदलही लागू करण्यात येणार आहेत. हे नियम २२ सप्टेंबरपासून लागू करण्यात आले आहेत.
आचारसंहितेच्या नियमानुसार आता खेळाडूंवर दंड आकारण्याबरोबर दुवर्तनाबद्दल गुण दिले जाणार आहेत. त्यांनी केलेल्या चुकीवर १ ते ८ दरम्यान गुण दिले जाणार आहेत. दोन वर्षासाठी हे गुण दिले जातील व त्यानुसार त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाणार आहे. गुणांच्या संख्येवर खेळाडूंवर किती सामन्यांसाठी निलंबन करायचे हे ठरणार आहे.