वन-डेतही गुलाबी चेंडूचा वापर करा - गावसकर
By admin | Published: January 16, 2016 01:06 AM2016-01-16T01:06:08+5:302016-01-16T01:06:08+5:30
पांढऱ्या चेंडूमुळे गोलंदाजांना काही मदत मिळत नसल्याने वन डे क्रिकेटमध्ये गुलाबी चेंडूचा वापर करण्याची सूचना माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी केली आहे.
ब्रिस्बेन : पांढऱ्या चेंडूमुळे गोलंदाजांना काही मदत मिळत नसल्याने वन डे क्रिकेटमध्ये गुलाबी चेंडूचा वापर करण्याची सूचना माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी केली आहे.
वन डेत मोठ्या धावा निघतात. सध्यातर ३०० धावा काढूनही विजय मिळेलच याची शाश्वती नसते. भारताने आॅस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वन डेत तीन बाद ३०९ धावा उभारल्यानंतरही पराभवाचे तोंड पाहावे लागले. यावर गावस्कर म्हणाले,‘पांढऱ्या चेंडूमुळे गोलंदाजांना काहीही लाभ होताना दिसत नाही. पांढऱ्या चेंडूला काहीही फरक न पाडणारा ‘चेंडू’ असे संबोधण्यास हरकत नाही. कसोटी क्रिकेटमध्ये गुलाबी चेंडूचा प्रयोग यशस्वी ठरला. वन डेतही हा प्रयोग करायला हवा. चेंडू आणि बॅटमध्ये संतुलन यावे यासाठी गुलाबी चेंडूचा वापर करण्यात हरकत नसावी.’