युवीची फटकेबाजी! सनरायझर्सची विजयी सलामी

By admin | Published: April 5, 2017 09:53 PM2017-04-05T21:53:54+5:302017-04-05T23:57:54+5:30

गतविजेत्या सनरायझर्स हैदराबादने आयपीएलच्या दहाव्या मोसमात विजयी सुरुवात केली आहे.

UV chattering! Sunrisers' victorious opening | युवीची फटकेबाजी! सनरायझर्सची विजयी सलामी

युवीची फटकेबाजी! सनरायझर्सची विजयी सलामी

Next
>ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 5 -  गतविजेत्या सनरायझर्स हैदराबादने आयपीएलच्या दहाव्या मोसमात विजयी सुरुवात केली आहे. युवराज सिंग आणि मोझेस हेन्रिक्स यांची फटकेबाजी, त्यानंतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर आज झालेल्या सलामीच्या लढतीत सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर 35 धावांनी मात केली.
 हैदराबादच्या आव्हानाचा पाठलाग करताना मनदीप सिंग (24) आणि ख्रिस गेल (32) यांनी बंगळुरूला आक्रमक सुरुवात करून दिली. पण हे दोघेही बाद झाल्यानंतर बंगळुरूचा डाव गडगडला. केदार जाधवने (31) फटकेबाजी केली, पण तो धावचीत झाल्यावर सामन्याचे पारडे पूर्णपणे हैदराबादच्या बाजूने झुकले. अखेर शेवटच्या षटकात बंगळुरूचा डाव 172 धावांवर संपुष्टात आला. हैदराबादकडून भूवनेश्वर कुमार आणि आशिष नेहरा यांनी प्रत्येकी दोन बळी टिपले.  
तत्पूर्वी  गतविजेत्या सनरायझर्स हैदराबादने आयपीएल-10 मधील सलामीच्या लढतीत 4 बाद 207 धावा फटकावत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर विजयासाठी 208 धावांचे आव्हान ठेवले होते. युवराज सिंगने अवघ्या 27 चेंडूत केलेली 62 धावांची झंझावाती खेळी आणि मोझेस हेन्रिक्स व शिखर धवनने केलेल्या समयोचित फलंदाजी हे हैदराबादच्या डावाचे वैशिष्ट्य ठरले. 
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर अनिकेत चौधरीने डेव्हिड वॉर्नरला (14) माघारी धाडत संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर मात्र हैदराबादी फलंदाजांनी बंगळुरूंच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. शिखर धवन (40) आणि मोझेस हेन्रिक्स (52) यांनी दुसऱ्या गड्यासाठी 74 धावांची भागीदारी करत संघाला सुस्थितीत आणले. त्यानंतर युवराज सिंगने अवघ्या 27 चेंडूत 62 धावांची स्फोटक खेळी करत हैदराबादला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने नेले. अखेरच्या षटकात बेन कटिंग (नाबाद 16) आणि दीपक हुडा नाबाद (16) यांनी 17 धावा वसूल करत हैदराबादला 4 बाद 207 अशी तगडी धावसंख्या उभारून दिली.   

Web Title: UV chattering! Sunrisers' victorious opening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.