राहुल आवारेची जागतिक क्रमवारीत गरुड भरारी; बजरंग पुनियानं अव्वल स्थान गमावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 12:54 PM2019-09-27T12:54:27+5:302019-09-27T12:55:02+5:30

जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताला 61 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावून देणाऱ्या महाराष्ट्राच्या राहुल आवारेने जागतिक कुस्ती क्रमवारीत गरुड भरारी घेतली आहे.

UWW Ranking : Rahul Aware is new World number 2 in 61kg category, Bajrang loses top rank | राहुल आवारेची जागतिक क्रमवारीत गरुड भरारी; बजरंग पुनियानं अव्वल स्थान गमावलं

राहुल आवारेची जागतिक क्रमवारीत गरुड भरारी; बजरंग पुनियानं अव्वल स्थान गमावलं

Next

जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताला 61 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावून देणाऱ्या महाराष्ट्राच्या राहुल आवारेने जागतिक कुस्ती क्रमवारीत गरुड भरारी घेतली आहे. शिवाय या स्पर्धेत रौप्यपदक विजेत्या दीपक पुनियानं 65 किलो वजनी गटाच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे, तर बजरंग पुनियाला अव्वल स्थान गमवावे लागले. राहुलने  61 किलो वजनी गटात कांस्यपदकाच्या लढतीत अमेरिकेच्या टेलर ग्राफचा 11-4 असा पराभव केला. या स्पर्धेत भारताने चार कांस्य व एक रौप्यपदक जिंकले आहे.

2018 मध्ये युवा राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची दखल घेण्यास भाग पाडले. पुढच्याच वर्षी त्याने कनिष्ठ आशियाई स्पर्धेत सुवर्ण जिंकले. जागतिक कनिष्ठ स्पर्धेतही त्याने रौप्यपदक जिंकले. नुकतेच 'लोकमत'ने  त्याला  'महाराष्ट्रीयन ऑफ द इअर' या पुरस्काराने गौरविले होते. 


86 किलो वजनी गटात दीपकने अंतिम फेरीत प्रवेश करून इतिहास घडवला, परंतु दुखापतीमुळे त्याला माघार घ्यावी लागली. त्यामुळे त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या कामगिरीच्या जोरावर 20 वर्षीय दीपकने 86 किलो वजनी गटाच्या अव्वल स्थानी झेप घेतली. 65 किलो वजनी गटात बजरंगची दुसऱ्या स्थानी घसरण झाली.    

57 किलो वजनी गटातील कांस्यपदक विजेत्या रवी दहीयानेही अव्वल पाचात स्थान पटकावले. महिलांमध्ये विनेश फोगाटने कांस्यपदकाच्या कमाई करताना 53 किलो वजनी गटाच्या दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. 

Web Title: UWW Ranking : Rahul Aware is new World number 2 in 61kg category, Bajrang loses top rank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.