भारताची ग्रँडमास्टर आर. वैशालीनं शह दिलेला तो चेहरा अन् या दोघांमधील कमालीचा योगायोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 15:51 IST2025-01-27T15:35:16+5:302025-01-27T15:51:40+5:30

इथं जाणून घेऊयात दोन्ही ग्रँडमास्टरसंदर्भातील कमालीच्या योगायोगासंदर्भातील गोष्ट

Uzbek GM Nodirbek Yakubboev declines hand-shake with Indian GM R Vaishali due to religious reasons apologises later And incredible coincidence between Both Chess Player | भारताची ग्रँडमास्टर आर. वैशालीनं शह दिलेला तो चेहरा अन् या दोघांमधील कमालीचा योगायोग

भारताची ग्रँडमास्टर आर. वैशालीनं शह दिलेला तो चेहरा अन् या दोघांमधील कमालीचा योगायोग

टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत भारतीय ग्रँडमास्टर आर वैशाली आणि उझबेकिस्तानचा ग्रँडमास्टर नोदिर्बेक याकुब्बेवा यांच्यात सामन्याआधी पाहायला मिळालेला सीन सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. तो आला तिनं त्याला पाहिलं अन् खिलाडूवृत्ती दाखवत सामन्याआधी हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढे केला. पण त्यानं हस्तांदोलन करण्यास नकार दिला अन् खेळ सुरु करण्यासाठी आपल्या जागेवर बसला. शेवटी भारताची ग्रँडमास्टर आर वैशालीनं या लढतीत प्रतिस्पर्धी खेळाडूला शह  दिला. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

व्हिडिओ व्हायरल झाला अन् मग परदेशी गँडमास्टरनं मागितली माफी
 
पण खेळ सुरु होण्याआधी घडलेल्या काही सेकंदाचा सीन सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. उझबेकिस्तानच्या खेळाडूनं भारतीय खेळाडूचा अपमान केल्याची चर्चा रंगू लागली. व्हिडिओ व्हायरल झाल्यावर या परदेशी खेळाडूनं माफी मागितली. एवढेच नाही तर धार्मिक भावना जपत असल्यामुळे महिलांना स्पर्श करत नाही, असे  कारणही त्याने सांगितले आहे. इथं जाणून घेऊयात दोन्ही ग्रँडमास्टरसंदर्भातील कमालीच्या योगायोगासंदर्भातील गोष्ट

ज्यानं भारतीय महिला खेळाडूला हस्तांदोन करण्यास नकार दिला त्याची बहिणही चेस प्लेयर

२३ जानेवारी २००२ मध्ये जन्मलेल्या २३ वर्षीय नोदिर्बेक याकुब्बेवा या बुद्धिबळपट्टूनं २०१९ मध्ये ग्रँडमास्टरची उपाधी मिळवलीये. जानेवारीच्या फिडे रँकिंगमध्ये तो २६५९ स्थानावर आहे. या बुद्धिबळपटूची मोठी बहिण निलुफर मुराडोव्हना याकुब्बेवा ही देखील एक लोकप्रिय आणि यशस्वी बुद्धिबळपटू आहे. २०१९ ते २०२१ सलग तीन वर्षे युझबेकिस्तान चेस चॅम्पियन्शिप स्पर्धा जिंकणाऱ्या निलुफर हिने २०२० मध्ये  वुमन इंटरनॅशनल मास्टर अन् २०२२ मध्ये वुमन ग्रँडमास्टर ही उपाधी मिळवलीये. 

प्रतिस्पर्धी खेळाडूप्रमाणेच खास आहे आर वैशालीची स्टोरी

आता कमालीचा योगोयाग हा की, उझबेकिस्तानच्या त्या प्रतिस्पर्धी प्रमाणेच २३ वर्षीय आर. वैशालीचा भाऊही बुद्धिबळ क्रीडा प्रकारातील प्रतिभावंत चेहरा आहे. ते नाव दुसरं तिसरं कोणी नसून ते आहे आर.  प्रज्ञानंद. फरक फक्त एवढाच की, भारताच्या पहिल्या वहिल्या ग्रँडमास्टर बहिण भावाच्या जोडीत बहिण थोरली अन् भाऊ धाकटा आहे.

Web Title: Uzbek GM Nodirbek Yakubboev declines hand-shake with Indian GM R Vaishali due to religious reasons apologises later And incredible coincidence between Both Chess Player

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.