वैभव जाधव ठरला 'ज्यूनियर मुंबई-श्री' 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 02:37 PM2020-01-06T14:37:27+5:302020-01-06T14:37:52+5:30

दिव्यांग मुंबई श्रीचा किताब सुदिश शेट्टीकडे तर फिटनेस फिजीकमध्ये अभिषेक पाडगावकर विजेता

Vaibhav Jadhav becomes 'Junior Mumbai-Sri' | वैभव जाधव ठरला 'ज्यूनियर मुंबई-श्री' 

वैभव जाधव ठरला 'ज्यूनियर मुंबई-श्री' 

Next

मुंबई : कोशिश करनेवालों की कभी हार नहीं होती है... दोन वर्षांपूर्वी तो पहिल्यांदा शरीरसौष्ठव स्पर्धेच्या मंचावर उतरला. ती स्पर्धा होती 'ज्यूनियर मुंबई श्री' आणि या स्पर्धेत तो 65 किलोमध्ये गटातच बाद झाला. मग गेल्यावर्षी त्याने पुन्हा प्रयत्न केले, तो 75 किलो वजनी गटात पाचवा आला. आणि आता दोनवेळचे अपयश पचवून तिसऱ्यांदा त्याच मंचावर 65 किलो वजनी गटात उतरला आणि पीळदार संघर्षानंतर आपल्यापेक्षा मोठ्या गटात विजेत्या ठरलेल्या शुभम धुरी आणि खुशाल सिंगवर मात करीत हेल्थ रूटीन म्हणजेच एच.आर. फिटनेसच्या वैभव जाधवने 'ज्यूनियर मुंबई श्री' किताबावर आपले नाव कोरले. दिव्यांगाच्या मुंबई श्री स्पर्धेत परब फिटनेसच्या सुदिश शेट्टीने बाजी मारली तर फिटनेस फिजीक प्रकारात फॉरच्यून फिटनेसच्या अभिषेक पाडगावकरने 'नवोदित मुंबई श्री'चा मान मिळविला.

 

मालाड पूर्वेला जय भवानी व्यायाम मंदिर ट्रस्टने आयोजित केलेल्या या स्पर्धेत विविध चार गटात सहभागी झालेल्या दोनशेपेक्षा अधिक खेळाडूंनी सुखटणकर वाडीत मैदान अक्षरश: फुलून गेले होते. 21 वर्षाखालील शरीरसौष्ठवपटूंच्या ज्यूनियर मुंबई श्री स्पर्धेला 96 खेळाडूंची उपस्थिती भुवया उंचावणारी ठरली. या वयात मुंबईच्या शरीरसौष्ठवपटूंनी कमावलेली पीळदार देहयष्टी पाहून उपस्थित प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. इतक्या मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या ज्यूनियर शरीरसौष्ठवपटूंमुळे स्टेजही अपूरे वाटत होते. पहिल्या चारही गटातील खेळाडूंची संख्या 20 पेक्षा अधिक होती.

 

अटीतटीची जेतेपदाची लढत

स्पर्धा ज्यूनियर खेळाडूंची असली तरी स्पर्धक तयारीतले असल्यामुळे जेतेपदाची लढत जोरदार झाली. सहाही गटातले विजेते एकमेकांसमोर उभे ठाकले तेव्हा जजेसला अव्वल खेळाडूची निवड करण्यासाठी 65, 70 आणि 75 किलो या गटातील खेळाडूंची कंपेरिझन करावी लागली. वैभवसमोर शुभम धुरी आणि खुशाल सिंगचे कडवे आव्हान होते. पंचांनी तिघांतला अव्वल खेळाडू निवडायला थोडा वेळ घेतला आणि 65 किलो वजनी गटातल्या वैभवच्या गळ्यात ज्यूनियर मुंबई श्रीची माळ घातली. या दिमाखदार स्पर्धेचा सोहळा आमदार सुनील प्रभू, अतुल भातखळकर, उपनगर संघटनेचे अध्यक्ष अमोल किर्तीकर, बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर, राजेश सावंत, सुनील शेगडे, जय भवानी व्यायाम मंदिराचे सुनील गोरड, अब्दुल मुकादम, विजय भोसले, शांताराम कदम यांच्या उपस्थितीत पार पडला.

 

कर हर मैदान फतेह...

या स्पर्धेची खरी जान होती दिव्यांग मुंबई श्री. पायाने दुबळे असले तरी प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर पीळदार देहयष्टी कमावणाऱ्या दिव्यांग शरीरसौष्ठवपटूंना मंचावर पाहताच उपस्थितांनी त्यांना मानाचा मुजरा केला. त्यांच्याकडे पाहिल्यावर प्रत्येक प्रेक्षकाच्या अंगावर अक्षरशः शहारे आले. ५० किलो आणि ५५ किलो अशा दोन गटात १६ खेळाडूंमध्ये स्पर्धा रंगली. ज्यात परब फिटनेसच्या सुदीश शेट्टीने यश मिळविले. ५० किलो गटात माँसाहेब जिमचा प्रथमेश भोसले पहिला आला. हा गट स्पर्धकांनाच नव्हे तर उपस्थित क्रीडाप्रेमींनाही स्फूर्ती देणारा ठरला.

 

मामेभावाकडे पाहूनच शरीसौष्ठवात वळलो - जाधव

आपला मामेभाऊ दिनेश कासारेची पीळदार शरीरयष्टी पाहून नेहमीच हेवा वाटायचा. त्यांच्यासारखी आपलीही बॉडी असावी, ही इच्छा मनात होतीच, म्हणूनच माझी पावलेही जिमकडे वळली. आधी कुटुंबाचा माझ्या खेळाला विरोध होता, पण नंतर तोसुद्धा मावळला. आता ते माझ्या पाठीशी आहेत. तीन वर्षांच्या मेहनतीनंतर ज्यूनियर मुंबई श्रीच्या रूपाने मला पहिले जेतेपद मिळाले आणि माझे कुटुंबीय खूप आनंदी झाले आहेत. आता मला माझ्या खेळावरच पूर्ण लक्ष केंद्रित करायचे आहे. मि. इंडियाचे जेतेपद पटकवायचे आहे. त्यासाठी मी माझे सर्वस्व पणाला लावून जिममध्ये घाम गाळेन. मला माझ्या या जेतेपदासाठी मामेभाऊ दिनेश, प्रफुल सकपाळ आणि सुजन पिळणकरचे आभार मानावेसे वाटते. त्यांच्या मार्गदर्शन आणि प्रोत्साहनामुळे मी यश संपादू शकलोय. ही तर सुरुवात आहे. खूप मोठा पल्ला गाठायचाय.

ज्यूनियर मुंबई श्रीचा निकाल

55 किलोः1. प्रशांत सडेकर (सालम), 2. यश महाडिक (दि मसल), 3. सुहास सावंत (ए टू झेड फिटनेस), 4. समीप मिरकर (आर.एम. भट), 5. उपेंद्र पेडणेकर (सालम जिम).

60 किलो : 1. प्रितेश गमरे (शिवाजी जिम), 2. निमिष निकम (अजय फिटनेस), 3. सिद्धेश सुर्वे (ग्रेस फिटनेस), 4. प्रथमेश जाधव (वेट हाऊज), 5. जिग्नेश चेनवलकर (माँसाहेब).

65 किलो : 1. वैभव जाधव ( एच.आर. फिटनेस), 2. दर्शन सणस (जय भवानी), 3. अंकित केदारी (सालम), 4. श्रेयस घाडगे (सचिन फिटनेस), 5. अक्षय काटकर (आर. एम. भट)

70 किलो : 1. शुभम धुरी (हर्क्युलस), 2. चिन्मय राणे ( बॉडी वर्क्स), 3. निखील राणे (बॉडी वर्क्स), 4. विनय सुलाखे (माँसाहेब), 5. आर्यन पटेल (फॉरच्यून फिटनेस)

75 किलो : 1. खुशाल सिंग (पंपिंग आर्यन), 2. प्रफुल पाटील (हर्क्युलस), 3. गणेश म्हाबदी (दांडेश्वर जिम), 4. विशाल कदम (माँसाहेब), 5. ओमकार म्हावरकर (गुरूदत्त).

75 किलोवरील : 1. विनायक जैसवाल (परब फिटनेस), 2. अनिकेत मयेकर (माँसाहेब), 3. विशाल कांगणे (एम फिटनेस), 4. अरनॉल्ड डिमेलो (फॉरच्यून), 5. निशांत तावडे (डी.एन. फिटनेस)

 

फिटनेस फिजीक नवोदित मुंबई श्रीचा निकाल

 

फिटनेस फिजीक (170 सेंमी) : 1. प्रशांत लाड ( बॉडी वर्क्स शाॅप) 2. अनिकेत सावंत (व्ही.के.फिटनेस), 3. नितीन राव (प्रो फिटनेस), 4. प्रतिक कुंभार (वैयक्तिक), 5. प्रवीण पाटील.

 ( आर.के. फिटनेस).

 

फिटनेस फिजीक (170 सेंमीवरील): 

1. अभिषेक पाडगावकर (फॉरच्यून फिटनेस), 2. गौरव मडवी (प्राइम फिट), 3. निलेश गिरी (आर.के.एम), 4. अलंकार पिंगे (फॉरच्यून फिटनेस), 5. अमोल शर्मा (फॉरच्यून फिटनेस).

 

फिटनेस फिजीक नवोदित मुंबई श्री :अभिषेक पाडगावकर (फॉरच्यून फिटनेस)

 

मास्टर्स मुंबई श्री (70 किलो) :1. रमेश पेवेकर (आर.एम.भट), 2. विनोद तेलगंडे (वैयक्तिक), 3. संतोष ठोंबरे (न्यू टाइम), 4. दत्ताराम कदम (जय भवानी), 5. संतोष चव्हाण (भारत फिटनेस).

मास्टर्स मुंबई श्री (70 किलोवरील) ; 1. मानप शेख (परब फिटनेस), 2. सखाराम शिंदे (वैयक्तिक), 3. संजय नडगावकर (आर.एम.भट), 4. अनिल वारे (ग्रेस फिटनेस), 5. जीतेंद्र सुरमा (आई माऊली).

मास्टर्स मुंबई श्री (50 वर्षावरील) :1. शशिकांत जगदाळे (गुरूदत्त), 2. दत्तात्रय भट (फॉरच्यून), 3. प्रकाश कासले (जय हनुमान), 4. प्रमोद जाधव (पाठारे जिम), 5. राजाराम नाखवा (मारूती).

 

दिव्यांग मुंबई श्री (५५ किलो) : १.  प्रथमेश भोसले (माँसाहेब जिम), २. मोहम्मद रियाज राय ( आर गोल्ड), ३.सचिन गिरी (आर के फिटनेस), ४. डॉमनीक हॉग (बॉडी वर्कशॉप).

 

दिव्यांग मुंबई श्री (५५ किलोवरील) : १. सुदिश शेट्टी ( परब फिटनेस), २. अक्षय सेजवळ ( समर्थ), ३.मेहबूब शेख (झेन फिटनेस), ४. मुग्नी नाडर (विशाल फिटनेस), ५. समीर कोळी (एस. आर. फिटनेस).

 

दिव्यांग मुंबई श्री विजेता :  सुदिश शेट्टी.

Web Title: Vaibhav Jadhav becomes 'Junior Mumbai-Sri'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.