... ' त्या ' दोन्ही बहिणी झाल्या ग्रँडमास्टर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 06:56 PM2018-08-13T18:56:47+5:302018-08-13T18:57:07+5:30
भारताची महिला बुद्धिबळपटू वैशाली आर. हिला आज ग्रँडमास्टर हा किताब मिळाला आहे. ग्रँडमास्टर किताब मिळवणारी ती आपल्या कुटुंबातली पहिली व्यक्ती नाही, तर तिच्या बहिणीलाही यापूर्वी ग्रँडमास्टर या किताबाने गौरवण्यात आले आहे.
मुंबई : भारताच्या शिरपेचात आज एक मानाचा तुरा खोवला गेला. कारण भारताची महिला बुद्धिबळपटू वैशाली आर. हिला आज ग्रँडमास्टर हा किताब मिळाला आहे. ग्रँडमास्टर किताब मिळवणारी ती आपल्या कुटुंबातली पहिली व्यक्ती नाही, तर तिच्या बहिणीलाही यापूर्वी ग्रँडमास्टर या किताबाने गौरवण्यात आले आहे.
चेन्नईच्या वैशालीने आज लॅटीव्हीया येथील रिगा टेक्निकल युनिव्हर्सिटीमध्ये आज ग्रँडमास्टर होण्याचा तिसरा आणि अंतिम निकष पूर्ण केला. लॅटीव्हीया येथे सुरु असलेल्या स्पर्धेत नऊ फेऱ्यामध्ये पाच गुणांची कमाई केली. या स्पर्धेतील अखेरच्या फेरीत वैशालीने रशियाची आंतरराष्ट्रीय मास्टर इल्या डूझाकोव्हशी बरोबरी साधली. या स्पर्धेत तिने 71वा क्रमांक पटकावला.
वैशाली आता 17 वर्षांची आहे. वैशालीने 18 वर्षांखालील खेळाडूंमध्ये सर्वाधिक गुण मिळवण्याचा पराक्रम केला आहे. सध्याच्या घडीला वैशालीच्या खात्यात 2,324 गुण आहेत. 2016 साली वैशालीने आंतरराष्ट्रीय महिला मास्टर हा किताब पटकावला होता.