घाटी रुग्णालयातील कर्मचारी, अधिकार्यांसाठी चालण्याची स्पर्धा
By Admin | Published: February 14, 2015 11:51 PM2015-02-14T23:51:00+5:302015-02-14T23:51:00+5:30
औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी, निवासी डॉक्टर व सर्व नर्सिंग स्टाफ यांच्यासाठी १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ६.३0 वाजता चालण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेचा शेवट बुद्ध लेणीवर होईल. स्पर्धेचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ. छाया दिवाण यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी नियोजन समितीचे अध्यक्ष डॉ. पूर्णचंद्र लामघरे, सदस्य डॉ. अरविंद गायकवाड, डॉ. ज्योती इरावने, डॉ. एम. एस. बेग, यशवंत कांबळे, विलास जगताप यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
औ ंगाबाद : घाटी रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी, निवासी डॉक्टर व सर्व नर्सिंग स्टाफ यांच्यासाठी १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ६.३0 वाजता चालण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेचा शेवट बुद्ध लेणीवर होईल. स्पर्धेचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ. छाया दिवाण यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी नियोजन समितीचे अध्यक्ष डॉ. पूर्णचंद्र लामघरे, सदस्य डॉ. अरविंद गायकवाड, डॉ. ज्योती इरावने, डॉ. एम. एस. बेग, यशवंत कांबळे, विलास जगताप यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.निरोगी जीवन जगण्यासाठी हलका व्यायाम आणि सकाळच्या स्वच्छ हवेत चालणे महत्त्वाचे आहे. हा संदेश या स्पर्धेतून दिला जाणार आहे. या स्पर्धेसाठी ४0 वर्षांखालील, ५0 वर्षांखालील व ५१ वर्षांवरील असे गट करण्यात आले आहेत. प्रत्येक गटातील प्रथम व द्वितीय क्रमांकावर येणार्यास पारितोषिक आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या स्पर्धेसाठी सहभागी होणार्यांनी सकाळी ६ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेश द्वारावर उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे. पुरुष आणि महिला यांचे स्वतंत्र गट आहेत. स्पर्धेचे परीक्षक म्हणून दयानंद कांबळे, जयराज देशपांडे असणार आहेत. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डॉ. खालेद बदाम, शेळके, आर.ए. पवार, बी.जी. मगरे, एस.आर. जामगे, दलसिंग सलामपुरे आदी परिश्रम घेत आहेत. (क्रीडा प्रतिनिधी)