वाल्मीकी बंधूंचा अफलातून खेळ; भारत विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2015 12:57 AM2015-06-24T00:57:18+5:302015-06-24T00:57:18+5:30
युवराज व देवेंद्र वाल्मीकी बंधूंच्या अफलातून खेळाच्या जोरावर वर्ल्ड हॉकी लीग उपांत्यफेरीच्या सामन्यात भारतीय हॉकी संघाने पोलंड संघाचा ३-० गोलने पराभव करीत आपले विजयी
एंटनर्प (बेल्जियम) : युवराज व देवेंद्र वाल्मीकी बंधूंच्या अफलातून खेळाच्या जोरावर वर्ल्ड हॉकी लीग उपांत्यफेरीच्या सामन्यात भारतीय हॉकी संघाने पोलंड संघाचा ३-० गोलने पराभव करीत आपले विजयी अभियान सुरू ठेवले.
भारताच्या या विजयात युवराजने २३, कर्णधार सरदारसिंगने ४१ आणि देवेंद्रने ५२ व्या मिनिटाला प्रत्येकी एक गोल करीत, संघाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलत आपल्या संघाचा दुसरा विजय साजरा केला.
१६ डिग्री सेल्सियस तापमान आणि थंड हवामानात पोलंड संघाला प्रतिकूल परिस्थिती त्यांनी पहिल्या क्वाटरमध्ये चांगला खेळ केला. त्यांनी आपल्या आघाडीच्या फळीत जास्त खेळाडू ठेवून भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. रमणदीप सिंगला लढतीच्या सुरुवातीला गोल करण्याची संधी मिळाली होती, पण. त्याचा त्याला फायदा घेतला आला नाही. पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. दुसऱ्या क्वार्टरमध्ये पोलंडच्या आघाडीच्या फळीने २० व्या मिनिटाला भारताची बचाव फळी भेदण्याचा प्रयन्त केला. त्यात त्यांना पेनेल्टी कॉर्नर मिळाला. त्यांचा कर्णधार पॉवेल ब्रॅटकोवस्कीच्या ड्रॅग फ्लिकवर भारताचा गोलरक्षक श्रीजेशने उत्कृष्ट बचाव केला.
२३ व्या मिनिटाला भारताच्या युवराजने मिळालेल्या संधीचा त्याने पूर्ण फायदा घेत पोलंडच्या गोरक्षकाच्या डोक्यावरुन चेंडू गोलमध्ये टाकला. त्यानंतर भारताचा कर्णधार सरदारसिंगने ४१ व्या मिनिटाला डीच्या तेथून गोलच्या दिशेने जोरदार फटका मारून आपल्या संघाचा दुसरा गोल केला. त्यानंतर लगेचच देवेंद्रने आपल्या पदार्पणाच्या स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात संघाचा दुसरा गोल केला. त्याने चिंगलेनसना सिंगने दिलेल्या पासला रिफ्लेक्ट करुन गोल करीत आपल्या संघाची गोल संख्या ३-० केली. ही भारताची आघाडी शेवट पर्यंत राहिली. भारताची पुढील लढत आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तांनविरुद्ध २६ जून रोजी होईल. (वृत्तसंस्था)