आॅस्ट्रेलियन मीडियाने केले विराटला ‘टार्गेट’

By admin | Published: March 23, 2017 12:31 AM2017-03-23T00:31:26+5:302017-03-23T00:31:26+5:30

भारताचा कर्णधार विराट कोहली याला आॅस्ट्रेलियन मीडियाने जबर टार्गेट केले आहे. आमचे दोन-तीन पत्रकार तर विराटची प्रतिमा धुळीस मिळविण्याच्या नेहमीच प्रयत्नात असतात

Varanasi 'Target' by Australian media | आॅस्ट्रेलियन मीडियाने केले विराटला ‘टार्गेट’

आॅस्ट्रेलियन मीडियाने केले विराटला ‘टार्गेट’

Next

नवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहली याला आॅस्ट्रेलियन मीडियाने जबर टार्गेट केले आहे. आमचे दोन-तीन पत्रकार तर विराटची प्रतिमा धुळीस मिळविण्याच्या नेहमीच प्रयत्नात असतात, असे मत माजी कर्णधार मायकेल क्लार्क याने व्यक्त करीत अप्रत्यक्षरीत्या विराटला पाठिंबा दिला.
आॅस्ट्रेलियातील ‘डेली टेलिग्राफ’मधील वृत्तात कोहलीची तुलना अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी करण्यात आली होती. आॅस्ट्रेलियाचे फिजिओ पॅट्रिक फॉरहर्ट यांच्यावर दडपण आणल्याचा कोहलीवर आरोप लावण्यात आला. याप्रकरणी ट्रम्प यांच्यासारखाच स्वत:चा कमकुवतपणा लपविण्यासाठी कोहली मीडियाला दोषी ठरवितो, असे वृत्तात म्हटले आहे. क्लार्कने मात्र भारतीय कर्णधाराची बाजू घेतली. एका वृत्तवाहिनीशी बोलताना क्लार्क म्हणाला, ‘‘विराटची ट्रम्पशी तुलना करणे मूर्खपणा आहे. विराटने जे केले, ते स्मिथनेदेखील केले असावे. याद राखा, मी आणि आॅस्ट्रेलियन चाहते विराटला पसंत करतात. तो ज्या प्रकारे खेळतो त्यात आॅस्ट्रेलियन खेळाडूची झलक दिसते. आव्हान स्वीकारण्याची त्याची वृत्ती अप्रतिम आहे. आमचे दोन-तीन पत्रकार त्याच्या मागे हात धुऊन लागलेले दिसतात. विराटला मात्र त्रस्त होण्याची गरज नाही.’’
क्लार्क म्हणाला, ‘‘आॅस्ट्रेलियन मीडियात जे प्रकाशित होत आहे ते वाचून स्मिथदेखील विचलित होत असावा. अशा स्थितीत दोन्ही कर्णधारांनी धरमशाला येथे विजय कसा मिळेल, याबद्दल चिंतन करण्याची गरज आहे. सध्याच्या मालिकेत २०१५ च्या अ‍ॅशेस मालिकेसारखी परिस्थिती उद्भवली आहे. त्या वेळी प्रत्येक सामना जीवनमरणाचा प्रश्न बनल्यामुळे विजयासाठी आम्ही सर्वस्व पणाला लावले होते. मैदानाबाहेर मात्र उभय संघांत मैत्रीभाव कायम होता. या मालिकेचा निर्णय अखेरच्या सामन्यात होईल, हे चांगले लक्षण आहे.’’
कोहली कुठल्याही क्षणी मोठी खेळी करू शकतो. विराट भक्कम खेळाडू आहे. अव्वल स्थानावर असलेल्या खेळाडूला भक्कम राहायलाच हवे. चॅम्पियन खेळाडूचे लक्षणदेखील हेच आहे. धरमशाला येथे मोठ्या धावा काढून तो विजय मिळवून देईल, यात शंका नाही. फलंदाजीला आला, की चाहत्यांची त्याच्याकडून शतकाची अपेक्षा असते, असे क्लार्कने नमूद केले.
(वृत्तसंस्था)

Web Title: Varanasi 'Target' by Australian media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.