वसई विरार महापौर मॅरेथॉन: मोहित राठोरची बाजी; अनिश थापानं मोडला पाच वर्षांपूर्वीचा विक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2019 03:37 PM2019-12-08T15:37:04+5:302019-12-08T15:38:15+5:30
जी.लक्ष्मणनचा 1:04:56 वेळेचा विक्रम मोडीत काढला.
मुंबई : वसई विरार महापौर मॅरेथॉनच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये मोहित राठोरने 2:24: 22 अशी वेळ नोंदवत अव्वल स्थान मिळवले. एलिट अर्ध मॅरेथॉनमध्ये पुरुष गटात अनिश थापा (01:04: 37) तर, महिला गटात किरण सहदेवने (1:17: 51) बाजी मारली. अनिश थापाने 2014 सालचा जी.लक्ष्मणनचा 1:04:56 वेळेचा विक्रम मोडीत काढला.विशेष म्हणजे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी आलेल्या खेळाडूंच्या वेळा देखील मागच्या विक्रमापेक्षा सरस होत्या.
पूर्ण मॅरेथॉनमध्ये मोहित राठोरने अव्वल स्थान मिळवले त्यापाठोपाठ सुखदेव सिंग (02:31.42) व धर्मेंदर(02 :32: 39 )यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान मिळवले. पुरुषांच्याच्या अर्धमॅरेथॉनमध्ये अनिश थापा (1:04:37), तीर्था पुन (01 :04:42) आणि दिनेश कुमार(1:04:46) या अव्वल तीन स्पर्धकांनी देखील जी.लक्ष्मणनचा विक्रम मोडीत काढला हे विशेष.महिला अर्धमॅरेथॉनमध्ये किरण सहदेव (01:17:51)हिने अव्वल स्थान मिळवले. तर, कोमल जगदाळे (01:18:24) व नंदिनी गुप्ता (01: 19: 13) यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान मिळवले. सध्याचा आशियाई मॅरेथॉन चॅम्पियन गोपी टी याची गेस्ट ऑफ हॉनर म्हणून उपस्थित होता.
पुरुषांच्या 11 किमी रनमध्ये 15 ते 29 वर्ष वयोगटात दिनकर लिलाके (00:36:08) यांनी बाजी मारली.30 ते 39 वर्ष वयोगटात प्रशांत पुजारी (00:47:44), 40 ते 49 वर्ष वयोगटात निर्मल महतो (00:41 :26) आणि 50 हुन अधिक वयोगटात सुरेश शर्मा (00:43:57) यांनी अव्वल स्थान मिळवले. महिलांच्या 11 किमी रनमध्ये 15 ते 29 वर्ष वयोगटात पूजा वर्माने (00:45:27), 30 ते 39 वर्ष वयोगटात अश्विनी देवरेने (00:57:17), 40 ते 49 वर्ष वयोगटात डॉ इंदू टंडन (00:54:22) तर, 50 हुन अधिक वयोगटात खुर्शीद मिस्त्री (00:59:22) अशी चमक दाखवली. पुरुष अर्धमॅरेथॉन मधील तिन्ही स्पर्धकांनी क्रम मोडीत काढल्याचे कळताच आनंद व्यक्त केला.धमाल धाव व 5 किमी रनमध्ये अनेकांनी सहभाग नोंदवला.
निकाल पुढीलप्रमाणे :
- एलिट पूर्ण मॅरेथॉन
1) मोहित राठोर (02:24:22)
2) सुखदेव सिंग (02:31:42)
3) धर्मेंदर (02:32:39)
4) रंजित सिंग (02:33:20)
5) पंकज धाका (02:35:09)
-एलिट अर्ध मॅरेथॉन (पुरुष)
1) अनिश थापा (01:04:37)
2) तीर्था पुन (01:04:42)
3) दिनेश कुमार (1:04:46)
4) विक्रम बी. (01: 17: 51)
5) नवीन ईश्वर (01:18:24)
- एलिट अर्ध मॅरेथॉन (महिला)
1)किरण सहदेव (01:17:51)
2)कोमल जगदाळे (01:18:24)
3)नंदिनी गुप्ता (01:19:13)
4) स्वाती गढवे (01:19:48)
5)पूनम दिनकर (01:20:46)
- 11 किमी रन : (पुरुष)
- 15 ते 29 वर्ष वयोगट :
1)दिनकर लिलाके (00:36:08)
2)अमित माळी (00:36:25)
3) शैलेश गंगोदा (00:36:37)
30 ते 39 वर्ष वयोगट :
1)प्रशांत पुजारी (00:47:44)
2) प्रमोद निंघोट (00:48:11)
3) अनुप तिवारी (00:48:58)
40 ते 49 वर्ष वयोगट
1)निर्मल महतो (00:41 :26)
2)सुंदर पाल (00:41:52)
3) दत्तकुमार सोनावले (00:45:21)
50 हुन अधिक वयोगट
1)सुरेश शर्मा (00:43:57)
2) हरीश चंद्रा (00:45:08)
3)मुकेश राणा (00:45:18)
11 किमी रन (महिला)
- 15 ते 29 वर्ष वयोगट :
1) पूजा वर्मा (00:45:27)
2) आरती देशमुख (00:46:13)
3) रोहिणी पाटील (00:47:13)
30 ते 39 वर्ष वयोगट
1)अश्विनी देवरे (00:57:17)
2) बर्नाडेन कलवाचवाला (01:00:18)
3) सोफिया टक (1:00: 34)
40 ते 49 वर्ष वयोगट
1)डॉ इंदू टंडन (00:54:22)
2) प्रतिभा नाडकर (00:55:41)
3) जयश्री प्रसाद (00:57:50)
50 हुन अधिक वयोगट
1)खुर्शीद मिस्त्री (00:59:22)
2) हेमा वासवाणी (01:05:51)
3)शोभा पाटील (01:05:52)