वेदांतू सावरकर बुद्धिबळ स्पर्धेत देशातून दुसरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 22:57 IST2019-09-25T22:56:43+5:302019-09-25T22:57:22+5:30
देशभरातून दुसरा क्रमांक पटकावित महाराष्ट्राची मान उंचावली आहे.

वेदांतू सावरकर बुद्धिबळ स्पर्धेत देशातून दुसरा
अमरावती : बंगळुरु येथील रुरल डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनद्वारे घेण्यात आलेल्या ३६ व्या खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत मूळचा अमरावतीचा निवासी व सध्या बंगळुरू येथे शिक्षण घेत असलेला वेदांतू निखिल सावरकर याने सात वर्षांआतील वयोगटात ५/६ गुण मिळवून देशभरातून दुसरा क्रमांक पटकावित महाराष्ट्राची मान उंचावली आहे.
सदर बुद्धिबळ स्पर्धा बँग्लोर येथील व्हर्जिनिया मॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती. यात खुला गटासह विविध वयोगटांतील शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला. वेदांत हा बँग्लोर येथील न्यू होरीझोन पब्लिक स्कूलचा इयत्ता पहिल्या वर्गाचा विद्यार्थी आहे. स्थानिक गणेश कॉलनीतील मूळ रहिवासी निखिल प्रफुल्ल सावरकर यांचा तो मुलगा व संतसाहित्यकार स्व. सुदाम सावरकर यांचा तो पणतू आहे.