वेदिका अमिनची ‘रेकॉर्डब्रेक’ कामगिरी
By Admin | Published: July 2, 2016 08:07 PM2016-07-02T20:07:30+5:302016-07-02T20:08:04+5:30
महाराष्ट्राच्या वेदिका अमिनने बंगळुरु येथील 33व्या ग्लेनमार्क सब ज्युनियर अॅक्वेटिक अजिंक्यपद स्पर्धेत 37.40 सेकंदाची नोंद करत आणखी एक ‘रेकॉर्डमोड’ कामगिरी केली
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 02 - महाराष्ट्राच्या वेदिका अमिनने बंगळुरु येथील 33व्या ग्लेनमार्क सब ज्युनियर अॅक्वेटिक अजिंक्यपद स्पर्धेत 37.40 सेकंदाची नोंद करत आणखी एक ‘रेकॉर्डमोड’ कामगिरी केली. वेदिकाने मोनिक गांधीचा 2010 मधील रेकॉर्ड मोडला. त्याचवेळी महाराष्ट्राच्या करिना शांक्ताने देखील 38.31 सेंकद या वेळेची नोंद करत रौप्य पदकावर नाव कोरले.
महाराष्ट्राच्या ऐका छत्रने मुलींच्या 100 मी. तिस-या गटात बॅकस्ट्रोकमध्ये 1.15.38 सेकंदांनी सुवर्ण पदक जिंकले. कर्नाटकच्या नीना व्यंकटेशने 1.15.52 सेंकदासह दुसरे स्थान पटकावले. तर रेकॉर्डब्रेकर वेदिका अमिनने 1.16.86 सेंकद वेळेची नोंद करत कांस्य पदकावर कब्जा केला. 50 मी. बटरफ्लाय गटात दिल्लीच्या ग्लेनमार्क सैन्साची अॅथलेट उत्तरा गोगोईने 31.25 सेकंदांचे नवीन रेकॉर्ड कायम करत सुवर्ण पदक जिंकले. तर छत्रने (31.45 सेंकद) दुसरे आणि आस्था चौधरीने (31.79 सेकंद) तिसरे स्थानावर ङोप घेतली.
स्पर्धेत 200 मी. वैयक्तिक मेडलेमध्ये महाराष्ट्राच्या रोनक सावंतने 2.47.49 सेकंदानी रौप्य पदक पटकावले. कर्नाटकच्या विदिथ एस. शंकरने 2.46.87 सेकंदाच्या टायमिंगने सुवर्ण पदक मिळवले. तर तामिळनाडूच्या एच.निथिकने 2.51.52 से. वेळ नोंदवत कांस्य पदक मिळवले. महाराष्ट्राच्या अनन्या पुनमियाने मुलींच्या 200 मीटर प्रकारात (2.56.60 सेंकद) रौप्य तर नित्या खिनवासराने (2.57.48 सेंकद) कांस्य पदक पटकावले.