वेगाचा बादशहा थांबला, सुवर्णपदकासह बोल्टची निवृत्ती

By admin | Published: August 20, 2016 09:13 PM2016-08-20T21:13:32+5:302016-08-20T21:23:09+5:30

जगातील सर्वात वेगवान धावपटू जमैकाच्या उसेन बोल्टने रिओ आॅलिम्पिक स्पर्धेत ४ बाय १00 मीटर रिले शर्यतीचे सुवर्णपदक पटकावत कारकिर्दीला सोनेरी रामराम केला आहे.

Vega's halting stopped, Bolt's retirement with gold | वेगाचा बादशहा थांबला, सुवर्णपदकासह बोल्टची निवृत्ती

वेगाचा बादशहा थांबला, सुवर्णपदकासह बोल्टची निवृत्ती

Next

शिवाजी गोरे

रिओ दि जानेरो, दि. २० - जगातील सर्वात वेगवान धावपटू, अविश्वसनीय अ‍ॅथलिट आणि स्वत:ला ‘दिग्गज’ संबोधणारा जमैकाच्या युसेन बोल्टने आपले स्वप्न पूर्ण करताना रिओ आॅलिम्पिक स्पर्धेत ४ बाय १00 मीटर रिले शर्यतीचे सुवर्णपदक पटकावत कारकिर्दीला सोनेरी रामराम केला आहे.
रिओ आॅलिम्पिक सुरु होण्यापूर्वी बोल्टने म्हंटले होते की, तो आपल्या शेवटच्या आॅलिम्पिकमध्ये ‘स्प्रिंट स्वीप’ करण्याचे त्याचे स्वप्न आहे. बोल्टने येथे १00 मीटर, २00 मीटर आणि ४ बाय ४00 रिलेचे सुवर्णपदक जिंकले आहे. या तिन्ही शर्यतीत बीजींग आणि लंडन आॅलिम्पिकनंतर सलग तिसऱ्यांदा आॅलिम्पिक हॅटट्रीक आहे. दोन दिवसापूर्वीच वयाची तिशी गाठलेल्या बोल्टचे हे सलग तिसरे आणि एकूण नववे सुवर्णपदक आहे.
जगातील सर्वात वेगवान पुरुष अशी उपाधी मिळवलेल्या बोल्टने जमैकाचे नेतृत्त्व करताना ४ बाय १00 मीटर रिले शर्यतीचे सुवर्णपदक जिंकले. जमैका संघाने ३७.२७ सेकंदाची वेळ नोंदवत पहिले स्थान पटकावले. धावपट्टीचा बादशहा बोल्टने आपल्या संघासाठी शेवटची धाव घेतली आणि सुवर्णपदक पटकावले.
सुवर्णपदकासह निवृत्ती घेणारा बोल्ट म्हणाला, आता मी दिग्गज आहे, असे मी म्हणू शकतो. मनातील सर्व इच्छा पूर्ण झाल्याने मी आता समाधानी आहे. मी खूप आनंदीत असून स्वत:चा मला अभिमान वाटत आहे. माझ्यावर मोठा दबाव होता.

Web Title: Vega's halting stopped, Bolt's retirement with gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.