जिल्हा कॅरम स्पर्धेत अनुभवी दिलेश खेडेकरची आगेकूच

By admin | Published: July 15, 2016 09:29 PM2016-07-15T21:29:37+5:302016-07-15T21:29:37+5:30

मुंबई उपनगरच्या खान साहेबचा २५-०, २५-१७ असा पराभव करुन जेव्हीपीजी पहिल्या संयुक्त जिल्हा कॅरम स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला

Veteran leader Dilsh Khedekar in District Carrom Competition | जिल्हा कॅरम स्पर्धेत अनुभवी दिलेश खेडेकरची आगेकूच

जिल्हा कॅरम स्पर्धेत अनुभवी दिलेश खेडेकरची आगेकूच

Next

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 - माजी राज्य विजेता मुंबईच्या दिलेश खेडेकरने मुंबई उपनगरच्या खान साहेबचा २५-०, २५-१७ असा पराभव करुन जेव्हीपीजी पहिल्या संयुक्त जिल्हा कॅरम स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. तर दुसरीकडे रंगतदार झालेल्या सामन्यात मुंबई उपनगरच्या प्रणव जाधवने मुंबईच्या हितेंद्र पटेलला नमवत बाजी मारली.
जुहू विलेपार्ले जिमखाना येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत दिलेशने आपल्या अनुभवाच्या जोरावर एकहाती वर्चस्व राखले. पहिला गेम निर्विवादपणे जिंकल्यानंतर दिलेशला खान साहेबकडून काहीप्रमाणात झुंज मिळाली. मात्र सामन्यावरील पकड निसटू न देता दिलेशने सलग दोन गेम जिंकताना सहज बाजी मारली.
दुसरीकडे तीन गेममध्ये झालेल्या अटीतटीच्या सामन्यात मुंबई उपनगरच्या प्रणव जाधवने मुंबई शहरच्या हितेंद्र पटेलचा २५-१२, ७-२५, २५-४ असा पराभव केला. पहिला गेम जिंकल्यानंतर प्रणवला हितेंद्रच्या आक्रमक खेळाला सामोरे जावे लागले. सामना १-१ असा बरोबरीत राहिल्यानंतर झालेल्या निर्णायक तिसऱ्या गेममध्ये प्रणवने हितेंद्रला फारशी संधी न देता विजयावर शिक्का मारला.
पालघरच्या सचिन पवारने सलग दोन गेम जिंकताना मुंबई शहरच्या कुलदीप वाघधरेचा २५-१५, २५-१२ असा पराभव केला. अन्य एका सामन्यात ठाण्याच्या वरुण गोसावीने एकहाती वर्चस्व राखताना मुंबई शहरच्या प्रितम पुराडकरचा २५-०, २५-० असा धुव्वा उडवला. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Veteran leader Dilsh Khedekar in District Carrom Competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.