....तर हा विजय सर्वोत्तम कामगिरी ठरेल : बॉर्डर
By admin | Published: March 24, 2017 11:48 PM2017-03-24T23:48:41+5:302017-03-24T23:48:41+5:30
स्टीव्हन स्मिथच्या नेतृत्वाखालील आॅस्ट्रेलियन संघ भारतात सुरू असलेली कसोटी मालिका जिंकण्यात यशस्वी ठरला तर
मेलबोर्न : स्टीव्हन स्मिथच्या नेतृत्वाखालील आॅस्ट्रेलियन संघ भारतात सुरू असलेली कसोटी मालिका जिंकण्यात यशस्वी ठरला तर आॅस्ट्रेलियाच्या क्रिकेट इतिहासातील ‘सर्वोत्तम पराक्रमांपैकी’ एक पराक्रम ठरेल, असे मत आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार अॅलन बॉर्डरने व्यक्त केले. उभय संघ चार सामन्यांच्या मालिकेत १-१ ने बरोबरीत आहेत. मालिकेतील अखेरचा सामना आज, शनिवारपासून धरमशालामध्ये खेळला जाणार आहे.
बॉर्डर म्हणाला, ‘कुठल्याही संघासाठी ही सर्वोत्तम कामगिरी ठरेल. कारण भारताला भारतात पराभूत करणे सोपे नाही आणि आॅस्ट्रेलियन क्रिकेटसाठी हे महत्त्वाचे आहे. भारताला पराभूत करण्यात यश मिळाले तर ते अविश्वसनीय असेल. आम्ही अॅशेसबाबत चर्चा करतो, पण त्यात आम्ही विजय मिळवण्यात अपयशी ठरल्याचे फारच कमी वेळा घडले आहे. भारताबाबत विचार करता येथे पूर्वीपासून आम्हाला फारच कमी यश मिळाले आहे.’ (वृत्तसंस्था)