विदर्भ
By admin | Published: February 20, 2015 01:10 AM2015-02-20T01:10:09+5:302015-02-20T01:10:09+5:30
तमिळनाडूचे वर्चस्व
Next
त िळनाडूचे वर्चस्वरणजी करंडक क्रिकेट : विदर्भाविरुद्ध दुसर्या डावात ३३७ धावांची आघाडीनागपूर : तमिळनाडूने रणजी करंडक उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत आज चौथ्या दिवशी विदर्भाचा पहिला डाव २५९ धावांत गुंडाळल्यानंतर एकूण ३३७ धावांची आहे. दुसर्या डावात त्यांच्या ४ विकेट अद्याप शिल्लक आहेत. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये खेळल्या जात असलेल्या या लढतीत तमिळनाडूने पहिल्या डावात ४०३ धावांची मजल मारली होती. प्रत्युत्तरात खेळताना विदर्भाने तिसर्या दिवसअखेर ६ बाद २०६ धावांची मजल मारली होती. गुरुवारी त्यापुढे खेळताना विदर्भाचा पहिला डाव २५९ धावांत संपुष्टात आला. रवी जांगिडला (२६) आज वैयक्तिक धावसंख्येत भर घालता आली नाही. पहिल्या डावात दमदार आघाडी घेणार्या तमिळनाडूने दुसर्या डावात ६ बाद १९३ धावांची मजल मारली. दुसर्या डावात तमिळनाडू संघाची सुरुवात निराशाजनक झाली. त्यांची सुरुवातीला ३ बाद २६ अशी अवस्था झाली होती. पहिल्या डावात ९६ धावांची खेळी करणारा सलामीवीर मुरली विजय केवळ १६ धावा काढून बाद झाला. दिनेश कार्तिक (६४) व विजय शंकर (८२) यांनी चौथ्या विकेटसाठी ८९ धावांची भागीदारी करीत डाव सावरला. कार्तिकने १०७ चेंडूंना सामोरे जाताना १० चौकार ठोकले, तर शंकरने १४६ चेंडूंमध्ये ९ चौकार व ३ षटकार ठोकले. हे दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर तमिळनाडूची पुन्हा एकदा घसरगुंडी उडाली. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी इंद्रजित (६) आणि एम. रंगराजन (३) खेळपीवर आहे. विदर्भातर्फे दुसर्या डावात स्वप्नील बंडीवारने ३ बळी घेतले. (क्रीडा प्रतिनिधी)