VIDEO: मालिका विजयानंतर टीम इंडिया म्हणाली 'थॅंक्यू कॅप्टन धोनी' !
By admin | Published: February 2, 2017 08:27 PM2017-02-02T20:27:51+5:302017-02-02T20:27:51+5:30
क्रिकेट जगताला दिलेल्या योगदानाबद्दल टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा सन्मान
Next
ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 2 - पाहुण्या इंग्लंड संघाचा कसोटी, वन-डे आणि टी-20 मालिकेत फडशा पाडल्यानंतर टीम इंडियाने हॉटेलमध्ये जल्लोष केला. यावेळी क्रिकेट जगताला दिलेल्या योगदानाबद्दल टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा सन्मान करण्यात आला. यादरम्यान संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळेंसह कर्णधार विराट कोहलीसह सर्व सदस्य उपस्थित होते.
धोनीबाबत बोलताना प्रशिक्षक कुंबळे म्हणाले, धोनी टीमच्या खेळाडुंसाठी प्रेरणास्त्रोत आहे, तो सच्चा आणि साहसी कर्णधार होता. भारतीय क्रिकेटला यशाच्या शिखरावर पोहोचवल्याबद्दल धोनीचे आभार .
कुंबळेनंतर धोनीच्या सन्मानासाठी कोहली पुढे आला. त्याने धोनीला चार स्टार असलेलं एक स्मृतिचिन्ह भेट दिलं. यामध्ये टी-20 वर्ल्डकप, 2011 वर्ल्डकप, 2013 चॅम्पियंन्स ट्रॉफी आणि कसोटीमध्ये संघाला नंबर एक बनवण्याचा प्रवास आहे.