Video: आनंदाश्रू अनावर! भारत सेमीफायनलमध्ये पोहोचला अन् कॉमेंटटेर सुनील तनेजा ढसाढसा रडले...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 11:33 AM2024-08-05T11:33:38+5:302024-08-05T11:36:32+5:30
Commentator crying video, IND vs GBR Hockey, Paris Olympics 2024: भारतीय हॉकी संघाने ग्रेट ब्रिटनला हरवून उपांत्य फेरीत मारली धडक
Commentator crying video, IND vs GBR Hockey, Paris Olympics 2024: भारतीय पुरुष हॉकी संघाने रविवारी कमाल करून दाखवली. उपांत्यपूर्व फेरीत ब्रिटनचा पराभव करून भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत धडक मारली. या रोमांचक सामन्यात भारतीय गोलरक्षक पीआर श्रीजेशने चमकदार कामगिरी करत संघाला विजयापर्यंत नेले. भारताने सामना जिंकताच देशात आनंदाची लाट उसळली. क्रीडाप्रेमी आनंद साजरा करू लागले. समालोचकदेखील यापासून स्वत:ला दूर ठेवू शकले नाहीत.
समालोचकाला आनंदाश्रू अनावर
भारतातील ऑलिम्पिकचे ब्रॉडकास्टर जिओ सिनेमासाठी समालोचन करणारे सुनील तनेजा भारताच्या विजयानंतर भावूक झाल्याचे दिसले. भारतीय हॉकी संघ जिंकताच ते भावूक झाले. भारतीय संघ सेमीफायनलमध्ये जातोय असं ओरडून ओरडून सांगू लागले आणि त्यानंतर ते कॉमेंट्री बॉक्समध्ये आनंदाने रडू लागले. त्यांचा आनंदात गगनात मावेनासा झाला. शेजारी उभे असलेल्या समालोचकाने पुढे कॉमेंट्रीची जबाबदारी स्वीकारली आणि त्यांनाही आधार दिला. हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. पाहा तो व्हिडीओ-
best commentator ever love you Sunil taneja paaji.🔥#Hockeypic.twitter.com/OjgsGjVewI
— Dhruv Tripathi (@Dhruv_tr108) August 4, 2024