VIDEO- 500 व्या कसोटीत माजी कर्णधारांचा सन्मान
By admin | Published: September 22, 2016 01:30 PM2016-09-22T13:30:58+5:302016-09-22T13:30:58+5:30
भारत आणि न्यूझीलंडदरम्यान कानपूरमध्ये 500 वा कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी बीसीसीआयने भारताच्या माजी कर्णधारांचा सन्मान केला.
Next
ऑनलाइन लोकमत
कानपूर, दि.22- भारत आणि न्यूझीलंडदरम्यान कानपूरमध्ये सुरू असलेला कसोटी सामना हा भारताचा 500 वा कसोटी सामना आहे. हा सामना खास बनवण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने विशेष कार्यंक्रमांचं आयोजन केलं आहे. सामना सुरू होण्यापूर्वी बीसीसीआयने भारताच्या माजी कर्णधारांचा सन्मान केला.
उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते माजी कर्णधार अजीत वाडेकर, कपिल देव, सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, के.श्रीकांत, रवी शास्त्री, मोहम्मद अजहरूद्दीन, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, अनिल कुंबळे, एमएस धोनी यांचा प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
भारताने 1932 मध्ये पहिला कसोटी सामना इंग्लंडविरोधात खेळला, तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे सीके नायडुंपासून विराट कोहलीपर्यंत 32 कर्णधारांनी भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे.
पाहा व्हिडीओ-
Former #TeamIndia Captains felicitated ahead of #500thTest - @Paytm Test Cricket #INDvNZpic.twitter.com/OzZGhQn4p0
— BCCI (@BCCI) September 22, 2016