VIDEO: आई-मुलीच्या भेटीसाठी नदालने थांबवली मॅच
By admin | Published: September 29, 2016 09:27 PM2016-09-29T21:27:01+5:302016-09-29T23:12:50+5:30
राफेल नदाल हा केवळ टेनिसमधीलच नाही जगातील सर्वश्रेष्ठ खेळाडूंपैकी एक आहे यामध्ये काही दुमत नाही. मात्र नुकत्याच घडलेल्या एका घटनेने
Next
सागर सिरसाट/ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 29 - राफेल नदाल हा केवळ टेनिसमधीलच नाही जगातील सर्वश्रेष्ठ खेळाडूंपैकी एक आहे यामध्ये काही दुमत नाही. मात्र नुकत्याच घडलेल्या एका घटनेने क्रीडाप्रेमींच्या मनात त्यानं आपलं स्थान आणखी उंचीवर नेलं आहे. विरोधी खेळाडुंबाबत नदाल कितीही निर्दयी असला तरी त्याच्यातही माणुसकी आहे हेच त्याने दाखवलं.
तुम्ही अनेकदा सामन्यांचं थेट प्रक्षेपण पाहिलं असेल आणि व्यत्ययामुळे सामना थांबतानाही बघितला असेल, मात्र एखादा महान खेळाडू स्वतःहून सामना थांबवतो असं क्वचितच घडतं. राफेल नदालचा अमेरिकेच्या खेळाडूंसोबत दुहेरी सामना सुरू होता. सामन्यादरम्यान प्रेक्षकांमधून एका महिलेचा आवाज ऐकायला आला, तिची मुलगी प्रेक्षकांमध्ये हरवली होती आणि त्यामुळे ती महिला अस्वस्थ होती. नदालच्या ही गोष्ट लक्षात आली आणि त्याने तात्काळ सामना थांबवला.
त्यानंतर महिलेच्या मुलीला शोधण्यात आलं व सामना पुन्हा सुरू झाला. ही घटना जरी प्रदर्शनिय सामन्यात घडली असली तरी यामुळे नदालने त्याच्या चाहत्यांसोबतच टीकाकारांचीही मनं जिंकली.
पाहा व्हिडीओ