Video: पाकिस्तानी कॅप्टनचा खोटारडेपणा चव्हाट्यावर
By admin | Published: June 13, 2017 07:26 PM2017-06-13T19:26:33+5:302017-06-13T19:33:15+5:30
पाकिस्तानच्या विजयात महत्वाची भूमिका बजावणा-या कर्णधार सरफराज अहमदचा खोटारडेपणा चव्हाट्यावर आला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
कार्डिफ, दि. 13 - चॅम्पियन्स ट्रॉफीच्या साखळी सामन्यात श्रीलंकेवर अडखळत विजय मिळवत पाकिस्तानी संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. पाकिस्तानच्या विजयात महत्वाची भूमिका बजावणा-या कर्णधार सरफराज अहमदचा खोटारडेपणा चव्हाट्यावर आला आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करणा-या श्रीलंका संघाची एकवेळ 165 वर 6 गडी बाद अशी दयनिय अवस्था होती. 34 व्या षटकात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर याच्या गोलंदाजीवर सरफराजने श्रीलंकेचा अष्टपैलू असेला गुणारत्ने याच्या बॅटची कट लागून आलेला झेल सोडला. झेल घेण्याचा त्याने चांगला प्रयत्न केला पण चेंडू त्याच्या गोल्व्ह्जमधून निसटला आणि खाली पडला.
चेंडू हातातून निसटून खाली पडला याची पूर्ण कल्पना असूनही सरफराजने मैदानावरील पंचांना तिस-या पंचांकडे विचारणा करण्यास सांगितलं.
निर्णायक खेळी करुन पाकला विजय मिळवून दिला. पण याच सामन्यात क्षेत्ररक्षण करताना सरफराजचा खोटेपणाही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तिसऱ्या पंचांना टीव्ही रिप्लेमध्ये चेंडू सरफराजच्या हातून निसटून खाली पडल्याचं आणि नंतर सरफाराजनं तो पुन्हा उचलल्याचं स्पष्ट दिसलं.
यानिमित्ताने पाकिस्तानी कर्णधाराचा खोटारडेपणा चव्हाट्यावर आला.
पाहा व्हिडीओ-
— Ashok Dinda (@lKR1088) June 12, 2017