Video : 'तू ने मारी एन्ट्री, और...'; बॉलिवूड गाण्यावर पी व्ही सिंधूनं धरला ठेका अन् चुकला अनेकांच्या काळजाचा ठोका!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 12:43 PM2021-08-21T12:43:13+5:302021-08-21T12:43:48+5:30

भारताची बॅडमिंटन स्टार पी व्ही सिंधू यानं टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकून इतिहास घडवला

Video : PV Sindhu dances to Bollywood music, celebrates Tokyo medal with her Badminton academy sparring partners  | Video : 'तू ने मारी एन्ट्री, और...'; बॉलिवूड गाण्यावर पी व्ही सिंधूनं धरला ठेका अन् चुकला अनेकांच्या काळजाचा ठोका!

Video : 'तू ने मारी एन्ट्री, और...'; बॉलिवूड गाण्यावर पी व्ही सिंधूनं धरला ठेका अन् चुकला अनेकांच्या काळजाचा ठोका!

Next

भारताची बॅडमिंटन स्टार पी व्ही सिंधू यानं टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकून इतिहास घडवला. सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पदक जिंकणारी ती भारताची पहिलीच महिला खेळाडू ठरली. रिओ ऑलिम्पिकमध्ये तिनं रौप्यपदक जिंकले होते. मायदेशात परतल्यानंतर पी व्ही सिंधूचे जंगी स्वागत झाले. कोट्यवधींच्या बक्षीसांचा वर्षाव झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यासोबत Ice Cream खाण्याचं तिचं स्वप्नही पूर्ण केलं. या सर्वानंतर सिंधूनं तिच्या सहकाऱ्यांसोबत विजयाचा जल्लोष साजरा केला. सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे आणि त्यात बॉलिवूडच्या गाण्यावर थिरकलेल्या सिंधूला पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. ( PV Sindhu dances to Bollywood music a video has gone viral) 

पदार्पणात हॅटट्रिक घेऊन वर्ल्ड रिकॉर्ड करणाऱ्या ऑसी गोलंदाजाला मिळालं आयपीएलचं तिकीट!

सिंधूनं बॉलिवूडच्या अनेक गाण्यांवर धरलेला ठेका पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला.  सुचित्रा बॅडमिंटन अकादमीत तिच्यासाठी खास पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. सिंधू यशामागे या व्हिडीओत दिसणाऱ्या प्रत्येकाचा मोलाचा वाटा आहे.  

पुढचे लक्ष्य जागतिक अजिंक्यपद - सिंधू
पी.व्ही. सिंधू हिने आपले पुढचे लक्ष्य निश्चित केले आहे. तिला यावर्षी होणाऱ्या विश्व चॅम्पियनशिपमध्ये आपले विजेतेपद कायम राखायचे आहे. तिने सांगितले की, ''स्पेनमध्ये विश्व चॅम्पियनशिप होणार आहे. त्यात चांगला खेळ करण्याची अपेक्षा आहे. मी अजून कांस्य पदकानंतरच्या भावनांमधून बाहेर येऊ शकलेली नाही. मी त्याचा आनंद घेत आहे. सलग दोन ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणे हे नक्कीच इतरांना प्रेरित करेल. लवकरच आंतरराष्ट्रीय स्पर्धा सुरू होतील. तसेच स्पेनमध्ये विश्वचॅम्पियनशिपदेखील होणार आहे. त्यात चांगला खेळ करेल, अशी अपेक्षा आहे. मी निश्चितपणे २०२४ ऑलिम्पिक खेळेल. मात्र त्याला वेळ आहे.''

Web Title: Video : PV Sindhu dances to Bollywood music, celebrates Tokyo medal with her Badminton academy sparring partners 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.