VIDEO- राहुलचे अर्धशतक, भारताचे इंग्लंडसमोर 145 धावांचे आव्हान
By Admin | Published: January 29, 2017 08:37 PM2017-01-29T20:37:37+5:302017-01-29T23:17:06+5:30
ऑनलाइन लोकमत नागपूर, दि. 29 - इंग्लिश गोलंदाजाच्या भेदक माऱ्यासमोर कानपूरनंतर नागपुरातही भारताची फलंदाजी ढेपाळली. त्यामुळे लोकेश राहुलच्या शानदार ...
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 29 - इंग्लिश गोलंदाजाच्या भेदक माऱ्यासमोर कानपूरनंतर नागपुरातही भारताची फलंदाजी ढेपाळली. त्यामुळे लोकेश राहुलच्या शानदार अर्धशतकी खेळीनंतरही इतर फलंदाजांनी साफ निराशा केल्याने भारताला दुसऱ्या ट्वेंटी-20 लढतीत 8 बाद 144 धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे भारताला इंग्लंडसमोर विजयासाठी 145 धावांचेच आव्हान ठेवता आले. भारताकडून लोकेश राहुलने एकाकी झुंज देताना 71 धावा फटकावल्या.
तत्पूर्वी इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केल्यावर कर्णधार विराट कोहली आणि लोकेश राहुलने यजमान संघाला आक्रमक सुरुवात करून देण्याचा प्रयत्न केला. पण उत्तुंग फटकेबाजी करण्याच्या नादात विराट कोहली 21 धावांवर बाद झाला. त्यानंतर रैना (7) आणि युवराज सिंग (4) हे झटपट माघारी परतल्याने भारताचा डाव अडचणीत आला.
त्यानंतर राहुल (71) आणि मनीष पांडे (30) यांनी चौथ्या गड्यासाठी 56 धावांची भागीदारी करत संघाला 100 पार पोहोचवले. पण अखेरच्या षटकांमध्ये इंग्लिश गोलंदाजांनी पुन्हा एकदा टिच्चून मारा केला. त्यामुळे भारतीय फलंदाजांना फटकेबाजीसाठी मोकळीक मिळाली नाही. त्यामुळे भारताचा डाव 20 षटकांमध्ये 8 बाद 144 धावांपर्यंतच पोहोचला.
भारत विरुद्ध इंग्लंड T20 सामना पाहण्यासाठी क्रिकेट प्रेमींची गर्दी
भारत विरुद्ध इंग्लंड T20 सामन्याच्या निमित्ताने जामठा स्टेडियमवर उसळली क्रिकेट रसिकांची गर्दी पाहून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. अनेकांना तिकीट न मिळालेल्या क्रीडा प्रेमींनी मैदानाबाहेर मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला. त्यामुळे काही वेळासाठी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. जामठा स्टेडियमकडे एकाच वेळी हजारो क्रिकेट रसिक वर्धा मार्गांवरून दाखल झाले होते.
https://www.dailymotion.com/video/x844q5i