VIDEO : रिओ ऑलिम्पिक : अन त्या खेळाडूचा पायच मोडला
By admin | Published: August 10, 2016 01:19 PM2016-08-10T13:19:53+5:302016-08-10T14:51:14+5:30
रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या फ्रेंच जिम्नॅस्ट समीर सैदचा खेळ सादर करताना पाय अचानक मोडल्याने गंभीर दुखापत झाली.
Next
ऑनलाइन लोकमत
रिओ दि जानेरो, दि. १० - रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणा-या प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असतं ते म्हणजे पदक मिळवून देशाची मान उंचावणे... त्यासाठी ते दिवसरात्र अथक मेहनत घेत असतात. अशाच स्वप्नामागे धावणा-या एका खेळाडूला मोठी किंमत चुकवावी लागली. ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या फ्रेंच जिम्नॅस्ट समीर सैदचा खेळ सादर करताना पाय अचानक मोडल्याने गंभीर दुखापत झाली. सैदचा पाय गुडघ्यातूनच मोडला. या गंभीर दुखापतीमुळे त्याला रिओ ऑलिम्पिकमधून बाहेर पडावे लागले असून त्याचे पदक मिळवण्याचे स्वप्न अधुरेच राहिले आहे.
मात्र त्यानंतरही समीरने स्पोर्ट्समन स्पिरीट कायम राखले असून या दुखापतीतून सावरल्यानंतर मी स्वत:च्या पायांवर उभा राहीन आणि टोकिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी होईन असा विश्वास त्याने व्यक्त केला.
विशेष म्हणजे समीरवर त्यानंतर तातडीनं सर्जरी करण्यात आलीय. ती यशस्वीही झालीये. दुखापत झाली असलीसुद्धा इतक्यात रिओ सोडणार नसल्याचंही समीरनं स्पष्ट केलंय. त्याचे साथीदार क्वालिफाय झालेत आणि फ्रेंच पथकाचं मनोबल वाढवण्यासाठी तो तेथेच थांबणार आहे.
Our deepest condolences to French Gymnast Samir Ait. You may have lost your career but you still have life.#Rio2016pic.twitter.com/RqVBGE6LBl
— Campus Today Ghana (@campustodaynews) August 9, 2016