Tokyo Olympic : नादच खुळा, आपली पोरगी जिंकली; ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाचा 'सैराट' जल्लोष, Video
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 04:18 PM2021-07-26T16:18:02+5:302021-07-26T16:18:35+5:30
ऑस्ट्रेलियन जलतरणपटू एरीअर्न तित्मुस हिनं टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत महिलांच्या 400 मीटर फ्रीस्टाईल स्पर्धेत अमेरिकेच्या कॅटी लेडेकीला पराभूत करून सुवर्णपदक पटकावले
Tokyo Olympic coach Dean Boxall's celebration : ऑस्ट्रेलियन जलतरणपटू एरीअर्न तित्मुस हिनं टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत महिलांच्या 400 मीटर फ्रीस्टाईल स्पर्धेत अमेरिकेच्या कॅटी लेडेकीला पराभूत करून सुवर्णपदक पटकावले ( Australian swimmer Ariarne Titmus defeated American swimmer Katie Ledecky to bag the gold medal in the women's 400m freestyle event). तित्मुसनं 3 मिनिटे 56.69 सेकंदाची नोंद करताना ऑलिम्पिक विक्रमासह सुवर्णपदक नावावर केले. अमेरिकेच्या लेडेकीला 3 मिनिटे 57.36 सेकंदासह रौप्य व चीनच्या बिंगजी ली हिनं 4 मिनिटे 01.08 सेकंदाच्या वेळेसह कांस्यपदक जिंकले.
Ariarne Titmus is the new Olympic champion in women’s 400 free with the 2nd fastest all-time performance. What a swim! pic.twitter.com/T7XEymGA3Z
— Swimming Stats (@SwimmingStats) July 26, 2021
अमेरिकेच्या खेळाडूला पराभूत करून सुवर्णपदक जिंकल्यानंतर तित्मुसचे प्रशिक्षक डिन बॉक्साल यांनी सैराल सेलिब्रेशन केलं आणि सोशल मीडियावर सध्या त्याचीच चर्चा आहे.
Australian swim coach Dean Boxall's celebration set to @JohnCena 's entrance music... 🔊🔊 pic.twitter.com/GeWvICS6KU
— Ben Heisler (@bennyheis) July 26, 2021