VIDEO - जगज्जेत्या वॅंगला दणका, सिंधू सेमिफायनलमध्ये
By Admin | Published: August 17, 2016 05:27 AM2016-08-17T05:27:08+5:302016-08-17T07:20:38+5:30
रिओ ऑलिम्पिमधील महिला एकेरीच्या सामन्यांत प्रतिस्पर्धी चीनच्या खेळाडूवर शानदार विजय मिळवून पी.व्ही. सिंधूने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली
ऑनलाइन लोकमत
रिओ, दि. १७ : रिओ ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंचा आतापर्यंतचा प्रवास हा निराशाजनक पाहायला मिळत असला तरी भारताची महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू हिच्याकडून पदकाची आशा अद्याप कायम आहे. रिओ ऑलिम्पिमधील महिला एकेरीच्या सामन्यांत प्रतिस्पर्धी चीनच्या खेळाडूवर शानदार विजय मिळवून पी.व्ही. सिंधूने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. या विजयासह तमाम भारतीयांना सिंधूकडून पदकाच्या आशा वाढल्या आहेत. महिला गटातील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अनुभवी सिंधू हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करताना चिनीची भींत भेदून पदकाकडे आगेकूच केली आहे.
सिंधूने लंडन ऑलिम्पिमध्ये रौप्यपदकविजेत्या चीनच्या वांग यिहानला २२-२०, २१-१९ अशा फरकाने धूळ चारताना थाटात उपांत्य फेरी गाठली. सिंधूने या स्पर्धेत उत्कृष्ट कामगीरी करताना दोन वेळा चीनच्या भींतीचा अडथळा दुर केला. उपउपांत्याफेरीत तिने आठवे मानांकन प्राप्त चिनी-तैपेईच्या तेई जू यिंग हिला अवघ्या ४० मिनिटांत २१-१३,२१-१५ अशा फरकाने धूळ चारताना उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.
पहिल्या गेममध्ये सिंधूला चीनची भींत भेदन शक्य होणार नाही असे दिसत होते. मात्र गेम सुर झाल्यानंतर चीनच्या वांगने खेळाची सर्व सुत्रे आपल्याकडे राखत आघाडी मिळवली होती. पण ११-९ अशी पिछाडीवर असताना आपले मनोबल वाढत सिंधूने पहिला सेट २२-२० अशा फरकाने जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये सिंधूने आपला खेळ अधिक उंचावत सामना सहज जिंकला. भारताची 'फुलराणी' सायना नेहवालचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्याने आता पी.व्ही.सिंधूच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.