Video : नीरज चोप्राला काय काय सहन करावं लागतंय?; मलिष्काच्या डान्सिंग मुलाखतीवर नेटिझन्स नाराज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 11:28 AM2021-08-20T11:28:06+5:302021-08-20T12:19:40+5:30
टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या नीरज चोप्राचा सर्वत्र सत्कार समारंभ सुरू आहे.
टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या नीरज चोप्राचा सर्वत्र सत्कार समारंभ सुरू आहे. टोक्योतून मायदेशात परतल्यानंतर नीरजला सातत्यानं सत्कार समारंभ व मिरवणुकीत भाग घ्यावा लागत आहे. त्यामुळेच त्याची तब्येतही बिघडली आणि त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले होते. त्यानंतरही सत्कार सोहळे थांबण्याचं नाव घेत नाही. नीरजची एक्सक्यूजिव्ह मुलाखत घेण्यासाठीही चढाओढ रंगली आहे. अशीच एक मुलाखत RJ मलिष्कानं घेतली, पण ऑनलाईन मुलाखत घेताना मलिष्का अन् तिच्या सहकारी चक्क डान्स करताना दिसल्या. त्यावर नीरजला इच्छा नसताना हसावं लागतं होतं. मलिष्काच्या या व्हिडीओवर नेटिझन्स चांगलेच खवळले.
भालाफेकपटू नीरजनं टोकियोत ८७.५८ मीटर लांब भालाफेक करून सुवर्णपदक पटकावले. भारताच्या ऑलिम्पिक स्पर्धा इतिहासातील १२५ वर्षांतील हे अॅथलेटिक्समधील पहिलेच पदक ठरले. २००८नंतर पहिल्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत राष्ट्रगीत वाजले. टोक्योत भारतानं या सुवर्णपदकासह दोन रौप्य व ४ कांस्य अशी एकूण ७ पदकं जिंकली. ऑलिम्पिक स्पर्धेतील ही भारताची सर्वोत्तम कामगिरी ठरली. वेटलिफ्टर मीराबाई चानू व कुस्तीपटू रवी कुमार दहिया यांनी रौप्यपदक जिंकेल, तर बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू, बॉक्सर लवलिना बोरगोईन, कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि पुरुष हॉकी संघानं कांस्यकमाई केली.
नेटिझन्स काय म्हणतात ते बघा...
Look guys, this is what Forced laughter means ! 😭 pic.twitter.com/qcZ1jnJJmi
— ° (@anubhav__tweets) August 19, 2021
Meanwhile neeraj bhai's mind : pic.twitter.com/9CbfbXtXgq
— SharmaJi (@SharmaaJie) August 19, 2021
— A&S L (@asllnl) August 19, 2021
More Cringe from Malishka : I want to give you Jadoo ki Jhappi
— Rosy (@rose_k01) August 20, 2021
Neeraj Chopra : Aapko Dur se hi NAMASTE 🙏😂🥇 pic.twitter.com/PWlTOj3q1Y