विजय क्लब, बडोदा विजयी नॉक आऊट : मिझान, केवलची सुरेख खेळी एस विशाल : २५ एप्रिल : मिझान सय्यद, केवल कदम

By admin | Published: April 26, 2016 12:16 AM2016-04-26T00:16:36+5:302016-04-26T00:16:36+5:30

पुणे : नॉक आऊट स्पर्धेत मिझान सय्यदच्या (४१ धावा व २ बळी) अष्टपैलू कामगिरीच्या बळावर विजय क्लबने मॉडर्न स्टार्स क्रिकेट क्लबचा ११४ धावांनी धुव्वा उडविला. बँक ऑफ बडोदाने सिंहगडचा, तर द क्लब ऑफ महाराष्ट्रने ज्योती क्रिकेट क्लबचा पराभव केला.

Vijay Club, Baroda wins the knock-out: Mizan, elegant only S Saurav: 25th April: Mizan Sayyed, Step Only | विजय क्लब, बडोदा विजयी नॉक आऊट : मिझान, केवलची सुरेख खेळी एस विशाल : २५ एप्रिल : मिझान सय्यद, केवल कदम

विजय क्लब, बडोदा विजयी नॉक आऊट : मिझान, केवलची सुरेख खेळी एस विशाल : २५ एप्रिल : मिझान सय्यद, केवल कदम

Next
णे : नॉक आऊट स्पर्धेत मिझान सय्यदच्या (४१ धावा व २ बळी) अष्टपैलू कामगिरीच्या बळावर विजय क्लबने मॉडर्न स्टार्स क्रिकेट क्लबचा ११४ धावांनी धुव्वा उडविला. बँक ऑफ बडोदाने सिंहगडचा, तर द क्लब ऑफ महाराष्ट्रने ज्योती क्रिकेट क्लबचा पराभव केला.
एनसीएल व लॉ कॉलेज महाविद्यालयाच्या मैदानावर हे सामने झाले. प्रथम फलंदाजी करणार्‍या विजय क्लबने २० षटकांत ७ बाद १९८ धावांची भक्कम खेळी केली. ऋतुराज गायकवाड (६०), मिझान सय्यद (४१) या सलामीच्या जोडीने संघाच्या भक्कम धावसंख्येचा पाया रचला. सौरभ नवले (३६), ओमकार पांडे (१९) व पवन शहा (१६) यांनी त्याला साथ दिली. कौस्तुभ चुमाळे व गुरबिर घई यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
विजयासाठी १९९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मॉडर्न स्टार्स संघाचा डाव १८.२ षटकांत ८४ धावांतच गडगडला. अली पूनावाला (१०) व शैलेश राशीनकर (३४) यांचा अपवाद वगळता इतर फलंदाज दुहेरी धावसंख्यादेखील उभारू शकले नाहीत. कपिल गायकवाड, मनोज यादव व मिझान सय्यद यांनी प्रत्येकी २ बळी घेत संघाला विजयी केले.
धावफलक :
विजय क्लब : २० षटकांत ७ बाद १९८, ऋतुराज गयाकवाड ६०, मिझान सय्यद ४१, संजय दारवटकर १४, पवन शहा १६ व ओमकार पांडे १९, कौस्तुभ चुमाळे २/२५, गुरबिर घई २/२३ वि. वि. मॉडर्न स्टार्स : १८.२ षटकांत सर्व बाद ८४, अली पूनावाला १०, शैलेश राशीनकर ३४, कौस्तुभ चुमाळे नाबाद ३.
सिंहगड : १८ षटकांत ६ बाद १४७, मयूर माताळे ३०, युवराज धावडे १७, रमेश पवार नाबाद ४१, रोहन माताळे नाबाद २३, क्षितिज आपटे २/१९, केवल कदम २/२१ पराभूत वि. बँक ऑफ बडोदा : १७.१ षटकांत ५ बाद १४८, लक्ष्मण जाधव १/१६, मोनीश माताळे १/२०.
द क्लब ऑफ महाराष्ट्र : १८ षटकांत २ बाद २०५, नौशाद शेख ३९, देवदत्त नातू ६०, रोहन रुद्रके ५०, अक्षय जोरे नाबाद ४३, चारुदत्त देडगे १/३८, आकाश बिडकर १/४५ वि. वि. ज्योती क्रिकेट क्लब : १३.१ षटकांत सर्व बाद १२५, योगेश गायकवाड १२, सचिन गायकवाड ३२, गुलशन आहिर ३१, चंद्रकांत भारद्वाज ४/१९, ओमकार तांदुळवाडकर २/०७.

Web Title: Vijay Club, Baroda wins the knock-out: Mizan, elegant only S Saurav: 25th April: Mizan Sayyed, Step Only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.