विजयवीरला तिसरे सुवर्ण, पदकतालिकेत भारत प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 04:37 AM2019-07-17T04:37:40+5:302019-07-17T04:37:44+5:30

आयएसएसएफ विश्वचषक ज्युनिअर नेमबाजीत मंगळवारी राजकंवरसिंग आणि आदर्शसिंग यांच्यासोबतीने पुरुषांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्ण जिंकले.

Vijayvira third gold, medal for India first | विजयवीरला तिसरे सुवर्ण, पदकतालिकेत भारत प्रथम

विजयवीरला तिसरे सुवर्ण, पदकतालिकेत भारत प्रथम

Next

नवी दिल्ली : भारताचा नेमबाज विजयवीर सिद्धू याने जर्मनीच्या सुहल येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक ज्युनिअर नेमबाजीत मंगळवारी राजकंवरसिंग आणि आदर्शसिंग यांच्यासोबतीने पुरुषांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्ण जिंकले. विजयवीरचे हे तिसरे सुवर्ण ठरले.
भारताने पदक तालिकेत अव्वल स्थान कायम राखले असून, ७ सुवर्णांसह एकूण १६ पदकांची कमाई झाली. भारताला दुसऱ्या दिवशी दुसरे पदक पुरुषांच्या दहा मीटर एअर रायफल प्रकारात हृदय हजारिका, यशवर्धन आणि पार्थ माखिजा यांच्या संघाने मिळवून दिले.
या तिघांनी १८७७.४ गुणांसह रौप्य जिंकले. चीनला सुवर्ण मिळाले. या दरम्यान चीनने विश्वविक्रमाची देखील बरोबरी केली. ज्युनिअर विश्व चॅम्पियन हृदयला दहा मीटर एअर रायफल प्रकारात धक्का बसला.

Web Title: Vijayvira third gold, medal for India first

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.